Ratan Tata: टाटा समूहाचे 'रत्न' अनंतात विलीन, रतन टाटांना अखेरचा निरोप

Last Updated:

Ratan Tata Death News:भारताच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

News18
News18

भारताच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळीतील पारशी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना दिली. अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांनीही रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रातील एका युगाचा अस्त झाला.अशी भावना सर्व क्षेत्रातून उमटत आहे.

October 10, 20246:10 PM IST

टाटा समूहाचे 'रत्न' अनंतात विलीन, रतन टाटांना अखेरचा निरोप

भारताच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळीतील पारशी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना दिली. अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांनीही रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रातील एका युगाचा अस्त झाला.अशी भावना सर्व क्षेत्रातून उमटत आहे.

October 10, 20245:04 PM IST

रतन टाटा यांना अखेरचा निरोप

October 10, 20245:04 PM IST

रतन टाटा यांना अखेरचा निरोप

advertisement
October 10, 20244:58 PM IST

रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले

October 10, 20241:11 PM IST

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

October 10, 202410:05 AM IST

Ratan Tata Death News LIVE: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कुलाब्यात रतन टाटा यांच्या घरी पोहोचला

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कुलाब्यात रतन टाटा यांच्या घरी पोहोचला
सचिन तेंडुलकरने रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं

advertisement
October 10, 20249:38 AM IST

Ratan Tata Death News LIVE: 'अनमोल रत्न' हरपलं

रतन टाटांचं पार्थिव सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नरीमन पॅाईट NCPA सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार
अंत्ययात्रा संध्याकाळी 4 वाजता नरीमन पॅाईटमधील NCPA इथून निघणार
मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, पेडर रोड, हाजी अली, वरळी जेट्टी, वरळी नाका, नेहरू विज्ञान केंद्र आणि माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी
वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

October 10, 20249:38 AM IST

Ratan Tata Death News LIVE: रतन टाटांना मिळालेले पुरस्कार

पद्मभूषण
पद्मविभूषण
महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
ऑनररी नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
ग्रँड ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ इटालियन रिपब्लिक
फ्रान्स सरकारचा कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर
ऑस्ट्रेलियाचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ सर्वोच्च पुरस्कार

 

October 10, 20249:38 AM IST

Ratan Tata Death News LIVE: रतन टाटांची सर्वसामान्यांसाठी मोठी कामं

कोविड काळात देशाला 500 कोटींची मदत
नवी मुंबईत प्राण्यांसाठी बांधलं रुग्णालय
श्वानांवर उपचारासाठी बांधलं रुग्णालय
एकाच वेळी 200 रुग्णांवर उपचार करता येतात
1998 मध्ये टाटांचा छोट्या वाहनांच्या निर्मितीत प्रवेश
2008 मध्ये सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बाजारात

October 10, 20249:37 AM IST

Ratan Tata Death News LIVE: रतन टाटांच्या खास गोष्टी 

रतन नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचे पणतू
पालक 1948मध्ये वेगळे झाल्यानंतर आजी नवजबाई टाटांनी संगोपन केलं
1961मध्ये टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर कामकाजाचं व्यवस्थापन
1991मध्ये ऑटो टू स्टील समूहाचे अध्यक्ष. 2012 पर्यंत आजोबांनी स्थापन केलेला समूह चालवला
2004 मध्ये टेटलीचं अधिग्रहण
जग्वार लँड रोव्हर घेण्यासाठी टाटा मोटर्स आणि कोरसचे अधिग्रहण
2009 मध्ये मध्यमवर्गीयांसाठी 1 लाख किंमतीची टाटा नॅनो
टाटा नॅनो, टाटा इंडिका यासह लोकप्रिय कारच्या व्यवसायाचा विस्तार
टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे चेअरमन

October 10, 20249:37 AM IST

Ratan Tata Death News LIVE: अमित शाह घेणार पार्थिवाचं अंत्यदर्शन

उद्योगपती रतन टाटांच्या अंत्यविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित…

मुंबईत दुपारी 4 नंतर वरळीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार…

 

October 10, 20249:36 AM IST

Ratan Tata Death News LIVE: रतन टाटांचं पार्थिव एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार

रतन टाटांचं पार्थिव एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार…

तर रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर ..

सरकारकडून आज दिवसभरातील कार्यक्रम रद्द…

October 10, 20247:52 AM IST

टाटांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण?

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा आणि उद्योग साम्राज्याचा वारस कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

रतन टाटांच्या उद्योग साम्राज्याचा वारस कोण? ही नावे आहेत चर्चेत

 

October 10, 20247:48 AM IST

दीपक केसरकर यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं.

 

October 10, 20247:48 AM IST

दीपक केसरकर यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं.

 

मराठी बातम्या/मुंबई/
Ratan Tata: टाटा समूहाचे 'रत्न' अनंतात विलीन, रतन टाटांना अखेरचा निरोप
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement