मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांचे 11 धुरंदर मैदानात, संपूर्ण यादी समोर

Last Updated:

मुंबईत शिवसेना ठाकरे गट 163 जागा, मनसे 53 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर लढत आहे. 

News18
News18
मुंबई :   महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने ठाकरे बंधुंबरोबर युती केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे युतीकडून 11 जागा देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे.

मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ

शरद पवार यांच्या पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झालेली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आला आहे. त्यामुळं मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा केली होती. मात्र, त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर अखेर ठाकरे बंधूबरोबर युती झाल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
क्र.वॉर्ड क्रमांकउमेदवाराचे नावआरक्षण
143श्री. अजित रावराणेसर्वसाधारण
2140श्री. संजय भीमराव कांबळेएस. सी.
378श्रीमती रदबा जावेद देऊळकरसर्वसाधारण महिला
448अॅड. गणेश शिंदेसर्वसाधारण
5170श्रीमती रूही मदन खानोलकरओबीसी महिला
651श्रीमती आरती सचिन चव्हाणसर्वसाधारण महिला
7112श्रीमती मंजू रविंद्र जायस्वालसर्वसाधारण महिला
8224श्रीमती सानिया कासिफ शाहसर्वसाधारण (महिला)
9165श्री. अभिजीत दिलीप कांबळेसर्वसाधारण
10107श्री. भरत हंसराज दनानीसर्वसाधारण
11211श्री. सुफियान अन्सारीसर्वसाधारण
advertisement

काय आहे मुंबईत ठाकरे- पवारांच्या युतीचं गणित? 

मुंबईत शिवसेना-भाजपची युती विरुद्ध ठाकरेंची शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या आघाडीत लढत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जागा वाटपासाठी प्रचंड संघर्ष होईल, असे बोलले गेले. परंतु ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक बैठकांमधून साधक बाधक चर्चा करून सुवर्णमध्य काढत जागा वाटपाचे अवघड गणित सोडवले. मुंबईत ठाकरे गटाने मनसे आणि राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र ठरवले. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट 163 जागा, मनसे 53 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर लढत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांचे 11 धुरंदर मैदानात, संपूर्ण यादी समोर
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement