शिंदेंच्या शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेला टक्कर, अंधेरी पूर्वमध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
Andheri-East Assembly result - महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व विधानसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये यावेळी महायुतीने अंधेरी-पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल (काका) यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 733 मतांनी विजय मिळवला आहे. यानंतर अंधेरी येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात हा विजयोत्सव साजरा केला.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व विधानसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये यावेळी महायुतीने अंधेरी-पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल (काका) यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 733 मतांनी विजय मिळवला आहे. यानंतर अंधेरी येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात हा विजयोत्सव साजरा केला.
महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व विधानसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. यावेळी महायुतीने अंधेरी-पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल (काका) यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये आजच्या निकालानुसार मुरजी पटेल यांचा 25 हजार 733 मतांनी विजय झाला आहे. तर ऋतुजा रमेश लटके यांचा पराभव झाला आहे.
advertisement
त्यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये ही थेट लढत होती. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली. त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. सकाळपासूनच मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी याठिकाणी झाली असून मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 132 जागांवर तर राष्ट्रवादी 40 शिवसेना 52 जागांवर आघाडीवर आहे. अर्ध्याहून अधिक निकाल जवळपास हाती आले आहेत. मुंबई, उपनगर आणि काही ठराविक ठिकाणचे निकाल अजूनही बाकी आहेत. राज्यात महायुतीला सर्वाधित मतं मिळाली आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 6:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शिंदेंच्या शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेला टक्कर, अंधेरी पूर्वमध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष, VIDEO