पुण्यात लाडक्या बहिणींच्या वतीने महायुतीचा विजय जल्लोषात साजरा, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
maharashtra assembly result live - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 132 जागांवर तर राष्ट्रवादी 40 शिवसेना 52 जागांवर आघाडीवर आहे. अर्ध्याहून अधिक निकाल जवळपास हाती आले आहेत. मुंबई, उपनगर आणि काही ठराविक ठिकाणचे निकाल अजूनही बाकी आहेत. राज्यात महायुतीला सर्वाधित मतं मिळाली आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 132 जागांवर तर राष्ट्रवादी 40 शिवसेना 52 जागांवर आघाडीवर आहे. अर्ध्याहून अधिक निकाल जवळपास हाती आले आहेत. मुंबई, उपनगर आणि काही ठराविक ठिकाणचे निकाल अजूनही बाकी आहेत. राज्यात महायुतीला सर्वाधित मतं मिळाली आहेत.
या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना सरकारच्या वतीने देण्यात येत आहेत. याच योजनेचा महायुतीला मोठा फायदा दिसून आला आहे. या योजनेमुळे महायुतीला हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
advertisement
तसेच सरकारने पुन्हा निवडून आल्यानंतर महिलांना 1500 वरुन 2100 रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे महिलांनी महायुतीला भरभरुन अशी साथ दिली. त्यामुळे कमी पैसे असले तरी नक्कीच त्यांचा आत्मविश्वास यामुळे वाढलेला आहे. महायुतीच्या या विजयानंतर पुण्यात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.
advertisement
द`रम्यान, पुण्यातील एकूण आठही मतदार संघातून भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यां मध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत असून डीजे साउंड, घोषणा देत विजयी आमदार असे पोस्टरही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
advertisement
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2024 5:08 PM IST