Panvel : माणुसकीला काळिमा फासणारी घटना; घरच्यांनीच 3 वर्षाच्या अपंग चिमुकलीसोबत भंयकर कृत्य,परिसरात खळबळ
Last Updated:
Panvel Railway Station News : पनवेल रेल्वे स्थानकावर पालकांनी तीन वर्षांच्या अपंग मुलीला सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. होमगार्डच्या सतर्कतेमुळे मुलगी सुरक्षित असून रेल्वे पोलिसांनी पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका अंदाजे तीन वर्षांच्या अपंग लहान मुलीला तिच्या पालकाने पनवेल रेल्वे स्थानकात सोडून देत पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोटच्या लेकीला उघड्यावर सोडून पालक फरार
पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डला अचानक एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता अंदाजे 3 ते 4 वर्षांची लहान मुलगी एकटीच रडत उभी असल्याचे दिसून आले. तिच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्राऊन रंगाची फुल नाईट पॅन्ट होती. आजूबाजूला तिच्यासोबत कोणीही पालक किंवा नातेवाईक दिसत नव्हते.
advertisement
होमगार्डने लगेच परिसरात चौकशी करत मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही कोणीही पुढे आले नाही. मुलीची विचारपूस केली असता तिने फक्त आपले नाव शिवानी असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित होमगार्डने तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
रेल्वे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा यामध्ये मुलीच्या पालकाने तिला पूर्णपणे टाकून देत तेथून निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी संबंधित पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel : माणुसकीला काळिमा फासणारी घटना; घरच्यांनीच 3 वर्षाच्या अपंग चिमुकलीसोबत भंयकर कृत्य,परिसरात खळबळ










