Pune Grand Tour : पुण्यात विदेशी सायकलपटूंचा मराठमोळा ठेका; 'नटीनं मारली मिठी' वाजताच जबरदस्त डान्स, Video व्हायरल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवासादरम्यान जेव्हा 'नटीनं मारली मिठी' हे गाणे वाजलं, तेव्हा खेळाडूंनी थकवा विसरून ठेका धरला. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून आलेल्या या सायकलपटूंना मराठी शब्दांचा अर्थ माहीत नसला, तरी या गाण्यातील ऊर्जेने त्यांना नाचायला भाग पाडलं.
पुणे : पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या समारोप दिनी आज पुण्यात खेळ आणि संस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या परदेशी सायकलपटूंना लोकप्रिय मराठी गाणं 'नटीनं मारली मिठी' नं अक्षरशः वेड लावलं. या गाण्याच्या ठेक्यावर विदेशी खेळाडूंनी मनसोक्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विदेशी सायकलपटूंचा मराठमोळा ठेका: स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस अत्यंत चुरशीचा आहे. मात्र, प्रवासादरम्यान जेव्हा 'नटीनं मारली मिठी' हे गाणे वाजलं, तेव्हा खेळाडूंनी थकवा विसरून ठेका धरला. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून आलेल्या या व्यावसायिक सायकलपटूंना मराठी शब्दांचा अर्थ माहीत नसला, तरी या गाण्यातील ऊर्जेने त्यांना नाचायला भाग पाडलं. या नृत्यामुळे स्पर्धेतील ताणतणाव विरून जाऊन एक आनंदी वातावरण निर्माण झालं.
advertisement
advertisement
जगभरातील सायकलपटूंचा सहभाग: पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राची ओळख जगाला करून देणारं एक माध्यम बनली आहे. यंदा या स्पर्धेत १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला होता. चार दिवसांच्या या खडतर प्रवासात खेळाडूंनी सह्याद्रीचे डोंगरदरे, वेगाने धावणारे महामार्ग आणि पुण्याच्या ऐतिहासिक रस्त्यांचा अनुभव घेतला.
advertisement
advertisement
क्रीडा आणि संस्कृतीचा मेळ: पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून विदेशी खेळाडूंना स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि लोकसंगीताची जवळून ओळख करून दिली जाते. खेळाडूंच्या डान्सचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून, मराठी गाण्यांची मोहिनी सातासमुद्रापार कशी पोहोचली आहे, याचीच ही प्रचिती आहे. या अनोख्या प्रसंगामुळे यंदाची पुणे ग्रँड टूर सायकलपटूंच्या आणि पुणेकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 11:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Grand Tour : पुण्यात विदेशी सायकलपटूंचा मराठमोळा ठेका; 'नटीनं मारली मिठी' वाजताच जबरदस्त डान्स, Video व्हायरल









