NCP Crisis : 'राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय तसा आला नसता तर..' ठाकरेंचा खोचक टोला

Last Updated:

NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रावादी काँग्रेसबाबत दिलेल्या निकालानंतर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंचा खोचक टोला
ठाकरेंचा खोचक टोला
मुंबई, (उदय जाधव, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी घोषित केली आहे. सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
राष्ट्रवादीबाबात असा निर्णय दिला नसता तर.. : ठाकरे
पडत्या काळामध्ये काळ पडता असतो, तेव्हा भविष्य काळ चढता असतो. आपण काय पडलो नाही. आपल्यात गद्दारी केली आहे. जो चढलाय त्याला आपण पाडणारच. आता मराठवाड्यात जाणार आहे. गद्दार आहेत, त्यांच्याविरोधात लोकांमध्ये चीड आहे. तुम्ही भाजप पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि तुम्हाला सतरंज्या उचलायला लावलं आणि गद्दाराना डोक्यावर बसवलंय. राष्ट्रवादी बाबतीत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो तसाच येणार होता. नसता दिला तर कोर्टाने हातोडा मारला असता. चोरच न्यायाधीश झाला अशी मी बातमी वाचली. खोटी कागदपत्रे सादर करून न्यायाधीश झाला. सुट्टीच्या काळात न्यायाधीश झाला. त्याने चोरांना सोडलं. त्याला जेव्हा पकडलं त्याने कबुली दिली. छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या त्या चोरांना सोडलं. पण ज्यांनी बलात्कारासारखे गुन्हे केलेत त्यांना सोडलं नाही. त्याच्यात तेवढी तरी नैतिकता होती. त्यांच्यात तेवढी तरी आहे का? ही कीड मारली पाहिजे. तुम्ही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही याची मी ग्वाही देतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसच्या निकालावर दिली आहे.
advertisement
गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. 10 हून अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शरद पवार गटाला वेळेवर बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे गोष्टी त्यांच्या बाजूने गेल्या नाहीत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीची अंतिम मुदत लक्षात घेऊन, शरद पवार गटाला निवडणूक आचार नियम 1961 च्या नियम 39AA चे पालन करण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यांना 7 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत नवीन पक्ष स्थापनेसाठी तीन नावे देण्यास सांगण्यात आली होती.
advertisement
शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी खलबतं सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आदिती नलावडे आणि वकील दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्यावतीने निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल पत्र देण्यात येणार आहे.
advertisement
अजित पवारांची शरद पवार गटाच्या पदाधिकारी नेत्यांना साद
राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील नेते पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आलं आहे. आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनाने आम्ही स्वागत करू असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना साद घातली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
NCP Crisis : 'राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय तसा आला नसता तर..' ठाकरेंचा खोचक टोला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement