Mumbai News : मुंबईकर वेळ वाचणार! 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार, वर्सोवा ते भाईंदर गेमचेंजर प्लॅन

Last Updated:

Versova- Bhayander Road : वर्सोवा-भाईंदर रस्त्याच्या प्रकल्पाला उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ दोन तासांवरून अवघ्या 20 मिनिटांवर येणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. ज्यात मेट्रो असो उड्डाणपूल, सागरी सेतू आणि नव्या रस्त्यांमुळे शहराचा विकास वाढला असला तरी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दररोजच्या कार्यालयीन वेळेत तसेच सुट्टीच्या दिवशीही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबईकरांचा मोठा वेळ प्रवासातच जातो.
वर्सोवा ते भाईंदर गेमचेंजर प्लॅन
ही समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेकडून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे उत्तर मुंबई सागरी सेतूच्या विस्तारित भागातील वर्सोवा-भाईंदर विकास आराखडा रस्ता होय. या प्रकल्पाला आता मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला परवानगी दिल्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.
advertisement
दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार
या नव्या मार्गामुळे वर्सोवा ते भाईंदरदरम्यानचा प्रवास सध्या लागणाऱ्या सुमारे दोन तासांवरून अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे प्रवासाचे अंतरही सुमारे 10 किलोमीटरने कमी होणार आहे. याचा मोठा फायदा दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकर वेळ वाचणार! 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार, वर्सोवा ते भाईंदर गेमचेंजर प्लॅन
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement