पुण्यातील आयटीच्या तरुणाचा प्रताप; विमानतळावर उघडली बॅग, आत दिसलं असं काही की पोलिसही थक्क
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अमित प्रजापती हा खराडी येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. तो इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने पुणे ते वाराणसी असा प्रवास करून आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशला निघाला होता.
पुणे: डोमेस्टिक विमान प्रवासात तपासणी फारशी होत नाही, या समज खराडी येथील एका आयटी कर्मचाऱ्याला चांगलाच महागात पडला. पुणे विमानतळावर सिक्युरिटी तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत लायटरसोबत तब्बल १२ ग्रॅम गांजाच्या पुड्या आढळल्या. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
अमित जियालाल प्रजापती (वय २८, रा. गुलमोहर सिटी, खराडी रोड, मूळ रा. आझमगड, उत्तर प्रदेश) असं गुन्हा दाखल झालेल्या आयटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. लोहगाव विमानतळ सुरक्षा तपासणी कक्षातील सुजित बालाजी कागणे (वय ३५) यांनी याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
advertisement
12 लाखांचे दागिने कपड्यांमध्ये विसरले; हाती लागताच.., बाणेरमधील लाँड्री मालकानं जिंकलं पुणेकरांचं मन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित प्रजापती हा खराडी येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. तो इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने पुणे ते वाराणसी असा प्रवास करून आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशला निघाला होता. त्याने विमानतळावर चेक-इनसाठी आपली बॅग दिली. स्कॅनिंग मशीनमध्ये तपासणी करताना बॅगेत प्रथम लायटर असल्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या (CISC) लक्षात आलं. नियमानुसार, लायटर ही वस्तू विमानात घेऊन जाण्यास मनाई असल्याने ती बॅग तपासणीसाठी बाजूला काढण्यात आली.
advertisement
जेव्हा प्रत्यक्ष बॅग उघडून लायटर काढलं जात होतं, तेव्हा कर्मचाऱ्याला लायटरसोबतच प्लास्टिकच्या दोन छोट्या पुड्या आढळल्या. तपासणी केल्यावर त्या पुड्यांमध्ये १२ ग्रॅम गांजा असल्याचं स्पष्ट झालं. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या तरुणाकडे अमली पदार्थ आढळल्यानं एकच खळबळ उडाली. या तरुणावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील आयटीच्या तरुणाचा प्रताप; विमानतळावर उघडली बॅग, आत दिसलं असं काही की पोलिसही थक्क










