Weather Update मराठवाडा अन् विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईत मात्र उकाडा वाढणार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट असणार आहे. पाहूयात 18 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हे, विदर्भातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याचा पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलाय. मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट असणार आहे. पाहूयात 18 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
कोकण विभागातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासात हलका पाऊस झाला. पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश हे साधारणपणे ढगाळ राहून उकडा राहणार आहे तर मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.
advertisement
मीनाक्षीचा स्पेशल विडा अन् 30 प्रकारचं पान, अख्ख्या सोलापुरात फेमस आहे हे ठिकाण
तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगरला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
याठिकाणी आहे 359 मुखी शिवलिंग, सोलापुरातील कुंडल संगम येथील अनोखा इतिहास
तर मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलाय. मागील 24 तासात मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 7:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Weather Update मराठवाडा अन् विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईत मात्र उकाडा वाढणार