मीनाक्षीचा स्पेशल विडा अन् 30 प्रकारचं पान, अख्ख्या सोलापुरात फेमस आहे हे ठिकाण
- Published by:News18 Marathi
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहारातील भवानी पेठेत मीनाक्षी पान शॉप आहे. या ठिकाणी पान खाण्यासाठी आवर्जून लोक येतात.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी अनेकांना पान खायला आवडतं. काही जणांना नियमित पान खाण्याची सवयही असते. पानशौकिनांचा मोठा इतिहास आणि परंपरा आपल्याकडं आहे. या मंडळीची आवड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात मिळतात. सोलापूर शहारातील भवानी पेठेत मीनाक्षी पान शॉप आहे. या ठिकाणी पान खाण्यासाठी आवर्जून लोक येतात. याबाबत अधिक माहिती पान विक्रेता अनिल पाटील यांनी दिली आहे.
advertisement
पानाचे विविध प्रकार
आपल्याकडे चॉकलेट पान, कुल्फी पान, आईस पान, मसाला पान, असे अनेक प्रकारचे पान बाजारात मिळतात. दुकानात जवळपास 30 प्रकारचे पान मिळतात. या दुकानात 15 रुपयांपासून ते 60 रूपयापर्यंतचं पान उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट पान, तरुणांसाठी मसाला पान अशी वयोगटानुसार पानांचे वर्गीकरण इथं पाहायला मिळते. खास मीनाक्षी स्पेशल पान खाण्यासाठी सोलापूरच्या अशोक चौक, सात रस्ता, रेल्वे लाईन, जूना विडी घरकूल, अक्कलकोट रोड येथून लोक येतात.
advertisement
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नाही
अनिल पाटील यांनी तंबाखू विरहित पान शॉप सुरू केलंय. अनेक जण पान खाऊन रस्त्यात कुठंही थुंकतात. या लोकांमुळे परिसर अस्वच्छ होतो. पानाची प्रतिमा डागाळते. हे प्रकार टाळण्यासाठीच मीनाक्षी पान शॉप दुकानात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाहीत. महिन्याला 22 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर या पान व्यवसायातून वर्षाला 3 ते 4 लाखांची कमाई होते, असं पाटील सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 17, 2024 4:49 PM IST