ही भाकर पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार, सोलापूरच्या महिलेने सुरू केला व्यवसाय, इतकी होतेय कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्यामुळे सोलापुरात कन्नड भाषिक लोकांचे प्रमाण जास्त आहे. कडक भाकरी ही कन्नड भाषिक लोकांचे पारंपारिक खाद्य आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : आज अनेक महिला या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांसमोर प्रेरणादायी आदर्श उभा करत आहेत. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. ही कहाणी प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारी आहे.
सोलापूर शहर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्यामुळे सोलापुरात कन्नड भाषिक लोकांचे प्रमाण जास्त आहे. कडक भाकरी ही कन्नड भाषिक लोकांचे पारंपारिक खाद्य आहे. त्यामुळे सोलापुरात कडक भाकरीला जास्त महत्त्व आहे. प्लॅस्टिक पिशवीमध्ये कडक भाकरीचे पॅकिंग केले जाते. एका पॅकेटमध्ये पाच भाकरी असतात. प्रति पाकीट 25 रुपये याप्रमाणे विक्री होत आहे. अंबिका भीमाशंकर म्हेत्रे (रा. शिंगणगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
ज्वारीचे पीठ, महिलांचा रोजगार, पॅकिंग असा सगळा खर्च वजा जाता दिवसाकाठी भाकरी विक्रेत्या अंबिका यांना 400 ते 500 रुपये मिळतात. या भाकरीमुळे सोलापुरातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हजारो महिला या भाकरीच्या जीवावर आपला संसार चालवतात. अंबिका मित्रे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कडक भाकरीचे मार्केटिंग सुरू केले आहे. तसेच सोशल मीडियावर ही अंबिका म्हेत्रे या कडक भाकरीचे मार्केटिंग करत आहेत.
advertisement
Samosa Kadhi : समोसा आणि कढी या यूनिक कॉम्बिनेशनला नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद, हे आहे लोकेशन, VIDEO
हाताने थापलेली मऊ भाकरी गरम तव्यावर ठेवून भाजली जाते. भाकरी भाजली की ती विस्तवासमोर ठेवली जाते. त्यानंतर ती मोकळ्या हवेत किंवा पंख्याखाली वाळवली जाते. जेव्हा भाकरीतील ओलावा संपतो, तेव्हा ती कडक बनते. पातळ थापल्यामुळे भाकरी पापडासारखी कुरकुरीत लागते. सोलापूरच्या या भाकरीला प्रचंड मागणी आहे. लोकांनाही या भाकरीनं वेड लावलं आहे. तर कडक भाकरीच्या व्यवसायातून अंबिका म्हेत्रे यांची 4 ते 5 लाखांची उलाढाल होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 07, 2024 4:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
ही भाकर पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार, सोलापूरच्या महिलेने सुरू केला व्यवसाय, इतकी होतेय कमाई