तुम्हालाही घरगुती स्पेशल श्रावण थाळी खायचीये?, तर मग ऐरोलीतील हे ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास!, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
इथे सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी खूप गर्दी असते. 55 वर्षीय गुनाबाई म्हस्कर यांनी भांडुपमध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. पण सध्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांचा मुलगा आणि सून हा व्यवसाय ऐरोलीमध्ये चालवत आहेत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसारख्या शहरामध्ये अनेकांना घरगुती जेवण मिळत नाही. अभ्यासानिमित्त किंवा कामानिमित्त अनेक जण या शहरामध्ये येतात. त्यामुळे या सगळ्यांना अगदी घरासारखं जेवण मिळावे, यासाठी गुनाबाई म्हस्कर या हॉटेल साई माऊलीच्या माध्यमातून मागील 18 वर्षांपासून कार्यरत आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे हॉटेल साई माऊली हे घरगुती जेवणासाठी प्रसिद्ध आहे. इथे सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी खूप गर्दी असते. 55 वर्षीय गुनाबाई म्हस्कर यांनी भांडुपमध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. पण सध्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांचा मुलगा आणि सून हा व्यवसाय ऐरोलीमध्ये चालवत आहेत.
advertisement
या हॉटेल साई माऊलीमध्ये तुम्हाला रोज नवनवीन भाज्या, भाकऱ्यांमध्ये सुद्धा ज्वारी, बाजरी असे प्रकार मिळतील. आता श्रावण महिना सुरू आहे तर तुम्हालाही जर श्रावण स्पेशल थाळी हवी असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. श्रावण स्पेशल थाळी तुम्हाला इथे मिळेल. ही संपूर्ण थाळी पंचपक्वानांनी भरलेली असते. यामध्ये दोन चपात्या, मटर पनीरची भाजी, श्रीखंड, ताक, मसूर ची आमटी, लिंबू आणि कांदा, डाळ, भात, पापड, लोणचं हे सगळे पदार्थ असतात. विशेष म्हणजे फक्त 100 रुपयांना ही थाळी तुम्हाला याठिकाणी मिळेल.
advertisement
Samosa Kadhi : समोसा आणि कढी या यूनिक कॉम्बिनेशनला नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद, हे आहे लोकेशन, VIDEO
काय म्हणाल्या गुनाबाई -
'मी गेले 18 ते 20 वर्षे या व्यवसायात आहे. सुरुवातीला आम्ही वडापावने सुरुवात केली होती. या व्यवसायाने माझा संपूर्ण कुटुंब सावरले आहे. ज्यांना घरगुती जेवण मिळत नाही ते लोक खूप आशेने इथे येतात, त्यामुळे जेवण बनवताना स्वच्छता हवी, असा माझा कटाक्ष पूर्वीपासुन होता,' असे गुनाबाई म्हस्कर यांनी सांगितले.
advertisement
तर मग तुम्हालाही श्रावणातील स्पेशल घरगुती थाळीची चव चाखायची असेल तर तुम्ही ऐरोलीतील या हॉटेल साई माऊलीला नक्की भेट देऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2024 2:18 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तुम्हालाही घरगुती स्पेशल श्रावण थाळी खायचीये?, तर मग ऐरोलीतील हे ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास!, VIDEO

