IT कंपन्यांमध्ये बंपर भरती, ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! 70,000 जागांसाठी थेट मुलाखती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इन्फोसिस, विप्रो, एचसीएल या आयटी कंपन्यांनी टियर-2, टियर-3 शहरांमध्ये ग्रॅज्युएट तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली असून कॅम्पस इंटरव्ह्यू ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार.
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ग्रॅज्युएट तरुणांसाठी मोठी भरती निघाली आहे. देशातील सर्वात तीन मोठ्या कंपन्यांनी भरती सुरू केली आहे. नामांकीत कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या कंपन्या कोणत्या आहेत? कुठे आणि कशी भरती निघाली याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने मोठ्या प्रमाणात भरती करत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. कॅम्पस हायरिंगची प्रक्रिया कंपनीने सुरू केली असून यंदा रिक्त पदांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त असणार आहे.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी वाढती गरज
कंपनीच्या मते, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्ससाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना संधी मिळणार असून विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
टियर-2 आणि टियर-3 शहरांवर लक्ष
इन्फोसिसने यंदा टियर-2 आणि टियर-3 शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. चीनच्या तुलनेत भारताला डिजिटल प्रोजेक्ट्समध्ये मोठा फायदा होतो. चीनमध्ये खर्च आणि टॅलेंट दोन्ही बाबतीत अडचणी आहेत, मात्र भारतात 10,000 हून अधिक महाविद्यालये असून 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी डिजिटल कौशल्यांसह उपलब्ध आहेत.
advertisement
2023 मध्ये इन्फोसिसने 50,000 भरती केली होती. 2024 मध्ये ही संख्या घटून 11,900 वर आली. 2025 मध्ये पुन्हा 15,000 भरती होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. फक्त इन्फोसिसच नाही तर विप्रो आणि एचसीएल यांसारख्या इतर मोठ्या आयटी कंपन्याही या वर्षी हायरिंग वाढवणार आहेत. विप्रोने 2024 मध्ये 40,000 कर्मचाऱ्यांची भरती केली होती आणि तीच संख्या 2025 मध्ये कायम ठेवण्याची योजना आहे.
advertisement
एचसीएलनेही गेल्या वर्षी 42,000 जणांना नोकरी दिली होती आणि यावर्षीही तितकीच भरती अपेक्षित आहे. डिजिटल कौशल्ये असलेल्या विद्यार्थ्यांना या हायरिंग वेव्हमुळे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे ठरणार आहे.
फेस टू फेस मुलाखत घेतली जाणार असून त्यातून निवड केली जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कॅम्पस इंटरव्ह्यूची सुरुवात होणार आहे. सातव्या सेमिस्टरनंतर मुलाखती तर आठव्या सेमिस्टरनंतर ट्रेनिंग होईल. 2026 रोजी इन्फोसिस 20 हजार, टीसीएस 40 हजार विप्रो 10 हजारहून अधिक रिक्त जागा भरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मोठी भरती होत आहे. ग्रॅज्युएट तरुणांसाठी ही चांगली संधी असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
IT कंपन्यांमध्ये बंपर भरती, ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! 70,000 जागांसाठी थेट मुलाखती