Mumbai Local Update : प्रवाशांची मोठी कोंडी होणार! सोमवार-मंगळवार 240 लोकल फेऱ्या रद्द; पाहा वेळापत्रक
Last Updated:
Western Railway Local Train Cancelled : कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे 12 आणि 13 जानेवारी रोजी 240 लोकल फेऱ्या रद्द राहणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी विशेष मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून हा ब्लॉक 11 जानेवारी आणि 12 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर लागू राहणार आहे. या कामाचा थेट परिणाम लोकल सेवांवर होणार असून या दोन तारखेला दिवसभरात प्रत्येकी 120 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 240 लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचा झटका
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कांदिवली ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचवेळी डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. हा ब्लॉक कांदिवली स्थानकातील पॉइंट आणि सिग्नलिंगशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
सविस्तर वेळापत्रक पाहा
याशिवाय सोमवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी कांदिवली ते मालाडदरम्यानही अशाच स्वरूपाचा रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 दरम्यान कामे केली जाणार आहेत. या संपूर्ण कालावधीत 12 डब्यांच्या लोकल, 15 डब्यांच्या लोकल तसेच एसी लोकल सेवाही रद्द राहणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 7:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Update : प्रवाशांची मोठी कोंडी होणार! सोमवार-मंगळवार 240 लोकल फेऱ्या रद्द; पाहा वेळापत्रक







