Thane Crime : पतीला सोडून तिसऱ्या प्रियकरासोबत राहिली, दुसऱ्याचा काटा काढला, पण...

Last Updated:

Thane Crime : ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं पतीला सोडून तिसऱ्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला.मात्र पुढे काय घडले ते एकदा वाचा.

News18
News18
ठाणे : आपण केलेले एखाद्या व्यक्तीवर प्रेम कधी आपल्याच जिवावर उठेत ते कधीच सांगता येत नाही. असंच काहीस एका व्यक्ती सोबत झालेले आहे. जिथे प्रेमाच्या नात्यामुळे संसार थाटणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीचे आयुष्य अडचणीत आले. विवाहीत महिलेवर जीव ओवाळून टाकणाऱ्या या व्यक्तीला अखेर तिच्या विश्वासघातामुळे प्राणघातक परिस्थितीला सामोरे जावे लागले. प्रेयसी दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडल्यावर,त्या तरुणाने साथीदारांच्या मदतीने 43 वर्षीय व्यक्तीला खाडीत ढकलून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोडक्यात तो वाचला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिचा प्रियकर आणि दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पहिली भेट कशी झाली?
वांगणी येथे राहणारा 43 वर्षीय व्यक्ती 2008 मध्ये कळव्यात आपल्या मित्राकडे काही दिवसत राहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची ओळख एका विवाहीत महिलेशी झाली. त्या महिलेचे पतीसोबत वारंवार वाद व्हायचे. अखेरीस दररोजच्या वादाला कटांळून ती पतीला सोडून आईकडे मुंब्रा येथे राहण्यासाठी गेली. दरम्यान त्या व्यक्तीचे त्या महिलेशी प्रेम जडले. त्यानंतर 2012 मध्ये तो महिलेला घेऊन मुंब्रा येथील रेतीबंदर येथे राहू लागला शिवाय तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी देखील त्यांच्या सोबत राहू लागली.
advertisement
पाच वर्षांनंतर म्हणजेच 2016 मध्ये त्या दोघांना मुलगा झाला. काही वर्षे संसार सुखाचा चालला.परंतु, नंतर त्या महिलेची आणखी एका तरुणासोबत ओळख झाली. हे लक्षात आल्यानंतर 43 वर्षीय व्यक्तीने त्याच्या बायकोला आणि मुलांना घेऊन बदलापूरला राहायला सुरुवात केली.
दुसऱ्या प्रेमसंबंधामुळे वाद
यावर्षी जानेवारी महिन्यात प्रेयसीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मुंब्रा येथे ओळख झालेल्या त्या व्यक्तीने महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा महिलेच्या दुसऱ्या पतीला समजले तेव्हा त्यांच्यामध्ये त्यावरुन मोठा वादही झाला.या वादाचा परिणाम असा झाला की, महिला आपल्या दुसऱ्या पतीला ही सोडून तिसऱ्या प्रियकरासोबत निघून गेली. ती कुठे राहते अन् अन्य या बाबतची माहिती महिलेच्या दुसऱ्या पतीला नव्हती.
advertisement
काही दिवस उलटल्यानंतर महिलेच्या दुसऱ्या पतीस ती ठाण्यातील एका भागात राहत असल्याचे समजले. त्यानंतर 19 सप्टेंबरला दुसरा पती तिला शोधण्यासाठी त्या भागात गेला आणि तिला भेटला. त्यावेळी महिलेने आपल्या मुलांना घेऊ जा असे सांगितेल. मात्र काही न बोलता महिलेचा दुसरा पती मुलांना घेऊन वांगणीला गेला. त्यानंतर 21 सप्टेंबरला तो पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला असता महिलेचे घर बंद होते.मात्र, महिलेने त्यांच्या मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवण्यास सांगितले आणि रात्री उशिरा त्याला फोन करून घरी बोलावले.
advertisement
असा आखला हत्येचा डाव
महिलेने बोलवला असता तो तिच्या घरी पोहचला. त्यावेळी महिलेचा तिसरा प्रियकर आणि त्याचे दोन साथीदार आधीपासून थांबलेले होते. त्यांनी त्याला धमकावले आणि रागा रागात रिक्षात बसवून मुंब्रा रेतीबंदर येथे नेले. तिथे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर प्रेयसीने फोनवर तिच्या प्रियकराला सांगितले,''मैने इसको बहुत मारा, इसका हाथ पैर तोड़ा है.'' त्यावर प्रेयसी म्हणाली, ''इसको मार कर खत्म कर दो, ये वापस नहीं आना चाहिए.'' तिने सांगितल्यानुसार आरोपींनी त्याला पुन्हा रिक्षात बसवले आणि खारेगाव खाडी पुलावर घेऊन गेले.
advertisement
तेथे पोहोचल्यावर ''चल आली तुझी जागा'' असे म्हणत त्याला खाडीत ढकलून दिले आणि तिथेून निघून गेले. सुदैवाने त्याने खाडीत असलेला सिमेंटचा खांब पकडला आणि जीव वाचवला. आरडाओरड ऐकून पूलावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांना कळवले. त्याला बाहेर काढून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.
शेवटी तक्रार दाखल
अखेर 22 सप्टेंबरला उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. पण नंतर प्रेयसीच्या आईला भेटून तिला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला आणि अखेर 23 सप्टेंबरला कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत महिलेचा अटक केली आहे.मात्र, तिचा तिसरा प्रियकर आणि त्याचे दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Thane Crime : पतीला सोडून तिसऱ्या प्रियकरासोबत राहिली, दुसऱ्याचा काटा काढला, पण...
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement