एकाहून सुंदर अशी नथ, तेही अगदी फक्त 50 रुपयांपासून, मुंबईतील हे मार्केट आहे भारी ऑप्शन, VIDEO

Last Updated:

नथ हा असा दागिना आहे, कोणत्याही कपड्यांची शोभा वाढवतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात नथ हा दागिना महिला वापरतात. सोन्यात घडवलेला हा दागिना सौंदर्यात भर घालणारा आहे. मोरपंखी नथ ही देखील हल्लीच्या काळात खूपच प्रसिद्ध झाली आहे.

+
महिलांची

महिलांची नथ

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : जेव्हा आपण पारंपारिक महाराष्ट्रीय दागिन्यांचा विचार करतो तेव्हा 'महाराष्ट्रीयन नथ' ही सर्वात आधी मनात येते. त्यामुळे असे नथीचे वेगवेगळे कलेक्शन मुंबईतील दीनानाथ मार्केट मध्ये पाहायला मिळते. याठिकाणी पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, मोरपंखी डाईमंड वर्क केलेली नथ अगदी 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत मिळतात. याचबाबत लोकल18 चा आढावा.
advertisement
सुंदर मोरपंखी नथ अगदी स्वस्त -
नथ हा असा दागिना आहे, कोणत्याही कपड्यांची शोभा वाढवतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात नथ हा दागिना महिला वापरतात. सोन्यात घडवलेला हा दागिना सौंदर्यात भर घालणारा आहे. मोरपंखी नथ ही देखील हल्लीच्या काळात खूपच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये छान बाकदार मोर असतो. या मोराचा आकार लहान मोठा असतो. त्यानुसार या नथीचा आकार ठरत असतो. या मोरपंखी नथची किंमत 100 रुपये आहे.
advertisement
पेशवाई नथ ही संस्कृती, कला आणि सर्जनशील प्रेमासाठी ओळखली जाते. ही नथही यातूनच प्रेरित आहे. पेशव्यांची कला, संस्कृती आणि सर्जनशीलता या नथीमध्ये पाहायला मिळते. याची किंमत 70 रुपये आहे. सध्या महिलावर्गात हिऱ्याच्या नथची क्रेझ सर्वाधिक पाहायला मिळत आहे. या नथीमध्ये अमेरिकन हिरे किंवा वास्तविक हिरे बसवले जातात. यासोबतच काही रंगाचे खडेही जोडलेले आहेत. या नथची किंमत ही 100 रुपयांपासून पुढे आहे.
advertisement
मित्राकडून उसने पैसे घेऊन सुरू केला व्यवसाय, आज ओम दही धपाटे ब्रँडची सर्वत्र चर्चा, नेमकं हे कसं जमवलं? VIDEO
मोत्याची नथ ही कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही नथ शोभून दिसते. या नथीसह आपण मोत्याचे दागिने घातले तर आणखी शोभा वाढते. या नथीची ओळख खड्यानेच होते. शिवाय ही नथ आकाराने सगळ्या नथींपेक्षा थोडी मोठी असते. याची किंमत ही 50 रुपयांना आहे. मराठा नथ ही महाराष्ट्रातील प्रचलित अशा नथीच्या प्रकारापैकी एक आहे. अर्धगोल मोत्यांची गुंफण करुन हा दागिना घडवला जातो. यामध्ये मोतीच्या दोन सरी किंवा एक सर असते. नथवरच्या भागावर मोर किंवा एखादा खडा असतो. अशी ही नथ नथडा म्हणून ओळखली जाते. या नथची किंमतही 50 रुपयांपासून पुढे आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
एकाहून सुंदर अशी नथ, तेही अगदी फक्त 50 रुपयांपासून, मुंबईतील हे मार्केट आहे भारी ऑप्शन, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement