8 वर्षांपूर्वी 400 रुपयांची गुंतवणूक, आता महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील तरुणाने करुन दाखवलं!, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
रुवातीला त्यांनी 400 ते 500 रुपयांची गुंतवणूक केली. व्यवसाय सुरू करताना चहा बनवता येत नव्हता. त्यामुळे ते चहा बनवायला शिकले. त्यानंतर हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला, तसा चहा प्रसिद्ध होत गेला. अगोदर साखरेचा चहा विकणाऱ्या सचिनने आता साखरेचा चहा सोडून गुळाचा चहा विकायला सुरुवात केली आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : अनेक जण नोकरीत करिअर करतात. तर काहींना व्यवसाय चांगला वाटतो. मात्र, व्यवसाय करत असताना अनेक अडचणींचा सामना करुनही अनेक जण त्यात यशस्वी होऊन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. या व्यक्तीने 8 वर्षांपूर्वी 400 रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरू केला. आज हा व्यक्ती महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
सचिन कराळे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील एसबीआय बँकेजवळ यांनी 8 वर्षांपूर्वी चहाचे हॉटेल सुरू केले. सुरुवातीला त्यांनी 400 ते 500 रुपयांची गुंतवणूक केली. व्यवसाय सुरू करताना चहा बनवता येत नव्हता. त्यामुळे ते चहा बनवायला शिकले. त्यानंतर हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला, तसा चहा प्रसिद्ध होत गेला. अगोदर साखरेचा चहा विकणाऱ्या सचिनने आता साखरेचा चहा सोडून गुळाचा चहा विकायला सुरुवात केली आहे.
advertisement
सचिनने काळानुरूप चहा विक्रीत बदल केला आहे. साखरेऐवजी ते आता गुळाचा चहा विकतात. अल्पावधीतच त्यांच्या गुळाच्या चहाला लोकांचा प्रतिसाद वाढत गेला. आता कराळे यांना दिवसाकाठी 60 ते 70 लीटर दूध लागते. तर दिवसाकाठी 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते. अशा प्रकारे ते त्यांच्या या व्यवसायात महिन्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे.
advertisement
एसबीआय बँकेशेजारी त्यांचे हॉटेल असल्याने या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी असते. चहाची गुणवत्ता चांगल्या प्रतीचे असल्यामुळे चहासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. अवघ्या 33 व्या वर्षी सचिन यांनी हॉटेलचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. 400 ते 500 रुपयात सुरू केलेल्या व्यवसाय आता महिन्याकाठी एक लाख रुपयांची त्यामुळे सचिन यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
advertisement
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 28, 2024 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
8 वर्षांपूर्वी 400 रुपयांची गुंतवणूक, आता महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील तरुणाने करुन दाखवलं!, VIDEO