मोठी बातमी! ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, डॉक्टरच्या घरातून शस्त्रसाठा जप्त, देशभरात खळबळ
- Reported by:प्रशांत लीला रामदास
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
हरयाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केले आहेत.
नवी दिल्ली: दहशतवादविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. हरयाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केले आहेत. त्याशिवाय, एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे मिळाली आहेत.
कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आदिल अहमद आहे. आदिल याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले आहे.
आदिल पूर्वी अनंतनागमधील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्याने २०२४ मध्ये तिथून राजीनामा दिला आणि त्यानंतर सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आदिलने फरीदाबादमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती.
advertisement
समोर आलेल्या वृत्तानुसार, डॉ. आदिल अहमदने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमध्ये एक खोली भाड्याने घेतली. आरोपी डॉक्टर तिथे राहत नव्हता. त्याने फक्त त्याचे सामान ठेवण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती.
> छापेमारीत काय सापडलं?
पोलिसांनी खोलीतून १४ बॅगा जप्त केल्या, ज्यामध्ये ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ५ लिटर रसायने, ८४ काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते.
advertisement
छापादरम्यान, १० ते १२ वाहने घटनास्थळी आली. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी संबंध असल्याचे तपासले जात आहे.
> कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित?
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तीन डॉक्टर या संघटनेशी संबंधित होते. यापैकी दोन डॉक्टर, आदिल अहमद राथेर (रहिवासी अनंतनाग) आणि मुझम्मिल शकील (रहिवासी पुलवामा) यांना सहारनपूर आणि फरीदाबाद इथं अटक करण्यात आली आहे, तर तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे. हे डॉक्टर दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंद शी संबधित असल्याची माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Faridabad,Faridabad,Haryana
First Published :
Nov 10, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/देश/
मोठी बातमी! ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, डॉक्टरच्या घरातून शस्त्रसाठा जप्त, देशभरात खळबळ











