काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने स्वत:ला संपवलं! बायकोवर गोळी झाडली; 108 नंबरला फोन लावला अन् बेडरूममध्ये संसाराचा 'खेळ खल्लास'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ahmedabad Yashraj Gohil Death Case : घरी परतल्यानंतर यशराज बेडरूममध्ये आपले रिव्हॉल्व्हर तपासत होते, त्याच वेळी चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट राजेश्वरीच्या मानेला लागली.
Husband Fired Bullet On Wife : एखाद्या गोष्टीच्या पश्चातापामुळे किती मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं, याची प्रचिती एका घटनेमधून समोर आली आहे. अहमदाबादमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्लास वन अधिकारी यशराज सिंह गोहिल यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी सुटल्याने त्यांची पत्नी राजेश्वरी गोहिल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीचा जीव गेल्याच्या धक्क्यातून सावरू न शकलेल्या यशराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यशराज हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल यांचे पुतणे होते.
बेडरूममध्ये रिव्हॉल्व्हर तपासत असताना...
या जोडप्याचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. यशराज आणि राजेश्वरी एका सामाजिक कार्यक्रमातून परतले होते आणि ते अत्यंत आनंदी दिसत होते. घरी परतल्यानंतर यशराज बेडरूममध्ये आपले रिव्हॉल्व्हर तपासत होते, त्याच वेळी चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट राजेश्वरीच्या मानेला लागली.
advertisement
त्याच बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली
यशराज सिंह गोहिल हे अहमदाबादमधील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर त्यांच्या कुटुंबासह राहत होते. यशराजने चुकून त्यांच्या पत्नीच्या डोक्यात परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली आणि नंतर त्याच बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली. यशराज सिंहची आई देवयानीबा यांच्या जबाबाचा हवाला देत जितेंद्र ब्रह्मभट्ट म्हणाले की, दोघे बेडरूममध्ये असताना यशराज सिंहच्या रिव्हॉल्व्हरने चुकून गोळी झाडली आणि राजेश्वरीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागली.
advertisement
हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लवकर या
गोळी सुटल्यानंतर यशराज यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला फोन केला. त्यांनी ऑपरेटरला सांगितले की, "मी गन फिरवत असताना चुकून गोळी माझ्या पत्नीला लागली आहे, कृपया तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लवकर या." 108 चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत राजेश्वरी यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करताच यशराज पूर्णपणे खचून गेले होते.
advertisement
डरूममधून गोळीबाराचा आवाज आला अन्...
दरम्यान, पॅरामेडिक्स आलं आणि त्यांनी राजेश्वरीला मृत घोषित केलं. देवयानीबा यांनी पोलिसांना सांगितले की, यशराज सिंग त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांना धक्का बसला होता. काही क्षणातच बेडरूममधून गोळीबाराचा आवाज आला. देवयानीबा आणि रुग्णवाहिका कर्मचारी आत परत आले आणि त्यांना यशराज सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळलं. त्यांच्या डोक्यातही गोळी लागली होती. त्यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आलं.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
Jan 23, 2026 8:15 AM IST
मराठी बातम्या/देश/
काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने स्वत:ला संपवलं! बायकोवर गोळी झाडली; 108 नंबरला फोन लावला अन् बेडरूममध्ये संसाराचा 'खेळ खल्लास'









