Saraswati Puja 2026: वसंत पंचमीची मनोभावे पूजा, पूर्ण 5 तासांचा शुभ मुहूर्त; सरस्वती पूजा विधी-मंत्र
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Saraswati Puja Vidhi 2026: आजचा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. माघ शुक्ल पंचमी तिथीला माता सरस्वती प्रकट झाली होती, म्हणून दरवर्षी या दिवशी सरस्वती जयंती साजरी केली जाते.
मुंबई : आज शुक्रवारी वसंत पंचमी साजरी होत आहे. सरस्वती पूजेसाठी 5 तासांहून अधिक काळ शुभ मुहूर्त उपलब्ध आहे. आजचा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. माघ शुक्ल पंचमी तिथीला माता सरस्वती प्रकट झाली होती, म्हणून दरवर्षी या दिवशी सरस्वती जयंती साजरी केली जाते. विधीवत पूजा केल्याने ज्ञान आणि बुद्धीमध्ये वृद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
सरस्वती पूजा मुहूर्त - माघ शुक्ल पंचमी तिथी आज, 23 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजून 28 मिनिटांनी सुरू झाली असून ती उद्या, 24 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजून 46 मिनिटांनी समाप्त होईल. सरस्वती पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त आज सकाळी 7 वाजून 13 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे.
advertisement
आजचे 4 शुभ संयोग - आज सरस्वती पूजेच्या दिवशी 4 मोठे शुभ योग जुळून आले आहेत. पहिला म्हणजे रवि योग, जो दुपारी 2 वाजून 33 मिनिटांपासून सुरू होईल. दुसरा परिघ योग असून तो दुपारी 3 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहील. तिसरा शिव योग दुपारी 3 वाजून 59 मिनिटांनंतर सुरू होईल. चौथा महत्त्वाचा संयोग म्हणजे आज शुक्रवार असल्याने सरस्वती पूजेसोबतच लक्ष्मी पूजा आणि वैभवाची प्राप्ती करण्याचे योगही जुळून आले आहेत.
advertisement
सरस्वती पूजा साहित्य यादी - देवी सरस्वतीची मूर्ती किंवा तसबीर, शृंगार साहित्य, पिवळी चुनरी किंवा साडी, लाकडी चौरंग, कलश, आंब्याची पाने, पिवळी फुले आणि हार, पिवळे वस्त्र, धूप, दीप, अत्तर, अक्षता, हळद, कुंकू, गुलाल, नारळ, फळे, गाईचे तूप, दूध, मिठाई, तिळाचे लाडू, बेसन लाडू आणि केशरयुक्त पिवळा भात (आपल्या क्षमतेनुसार साहित्य घ्यावे)
advertisement
सरस्वती पूजा मंत्र -
या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
किंवा
ऐं महासरस्वत्यै नमः
सरस्वती पूजा विधी - वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पूजेचा संकल्प करावा. पूजेच्या जागी मांडव तयार करून लाकडी चौरंगावर देवीची स्थापना करावी. देवीला अक्षता, फुले, धूप, दीप, अत्तर आणि गुलाल अर्पण करावा. माता सरस्वतीला शृंगार साहित्य आणि साडी अर्पण करून पिवळ्या मिठाईचा किंवा पिवळ्या भाताचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर सरस्वती वंदना, चालीसा आणि मंत्रांचे पठण करावे. सर्वात शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा. घरातील मुलांच्या शिक्षणात प्रगती होऊ दे, यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:07 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Saraswati Puja 2026: वसंत पंचमीची मनोभावे पूजा, पूर्ण 5 तासांचा शुभ मुहूर्त; सरस्वती पूजा विधी-मंत्र









