Navi Mumbai : जानेवारीची ती रात्र सुमितच्या कुटुंबासाठी काळरात्र; पोलिसांकडून शोध सुरू, पण घडलं काय?

Last Updated:

Panvel Hit And Run Accident : पनवेलमधील जेएनपीटी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 वर्षीय डिलिव्हरी बॉय सुमित झा याचा मृत्यू झाला. सहा दिवस उपचार सुरू असताना 14 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरू आहे.

  Panvel Hit And Run Accident
Panvel Hit And Run Accident
नवी मुंबई : पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेएनपीटी रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुमित सुदर्शन झा असे मृत तरुणाचे नाव असून तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हा अपघात 8 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुंडेवहाल येथील कालुबाई मंदिराजवळ घडला.
जेएनपीटी रोडवर काळाचा घाला
सुमित हा आपल्या मोटरसायकलवरून उलवे ते पनवेल लेनच्या दिशेने जात होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुमित रस्त्यावर फेकला गेला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातात सुमितच्या डोक्याला, हाताला आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
advertisement
अपघातातील जखमी तरुणाने सोडला प्राण
सुमितने तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर 14 जानेवारी रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुमितच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे. अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : जानेवारीची ती रात्र सुमितच्या कुटुंबासाठी काळरात्र; पोलिसांकडून शोध सुरू, पण घडलं काय?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement