व्हायरल होण्यासाठी बापाला पोत्यात भरलं; रीलवेड्या कुटुंबाचं कृत्य पाहून सारेच चक्रावले; पण...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोतं उघडताच कर्मचारीही हादरले कारण आत एक वृद्ध व्यक्ती श्वास घेण्यासाठी धडपडत होती.
बंगळूरू: लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात रक्ताची नाती विसरणाऱ्या एका कुटुंबाचा संतापजनक प्रकार बंगळुरूमध्ये उघडकीस आला आहे. गुढीपाडवा, उगादी आणि ईदच्या सणामुळे बसचे भाडे वाढले आहे आणि तिकीट मिळत नाही, हे जगाला दाखवण्यासाठी एका कुटुंबाने आपल्या वृद्ध वडिलांनाच 'पार्सल' बनवले. वडिलांना एका पोत्यात भरले आणि त्यांना कुरिअर ऑफिसमध्ये घेऊन आले. हा सर्व प्रकार केवळ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी केल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, बंगळुरू भागातील कुटुंब एका कुरिअर ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत एक मोठी पोतं असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे, हे कुटुंबीय कुरिअर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना ते पोतं आत ओढून नेण्यास सांगत आहेत. कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ते पोतं उघडलं. पोतं उघडताच कर्मचारीही हादरले कारण आत एक वृद्ध व्यक्ती श्वास घेण्यासाठी धडपडत होती. मानवी तस्करी किंवा काही गंभीर गुन्हा असल्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला.
advertisement
पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी
पोलिसांनी या कुटुंबातील पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. यावेळी या प्रकारामागील महिलेने धक्कादायक कबुली दिली. सध्या सणासुदीमुळे बसची तिकिटे महाग झाली आहेत आणि जागा मिळत नाही, हे उपरोधिकपणे दाखवण्यासाठी आम्ही हा प्रकार केल्याचे तिने सांगितले. मात्र, वडिलांचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कृत्यामुळे पोलिसांनी या सर्वांना चांगलाच 'खाक्या' दाखवला.
advertisement
Daughter & family stuff father in gunny bag, take him to courier office to "send parcel" out of Bengaluru all for a reel showing it's easier to courier a man than book bus/train tickets this festive season. Now in police station.
Weird world. 😭
pic.twitter.com/gGEpKeeYjM
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 17, 2026
advertisement
पोलिसांच्या कारवाईनंतर कुटुंबाचे उघडले डोळे
पोलिसांच्या कारवाईनंतर या कुटुंबाचे डोळे उघडले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडr ओ पोस्ट करून जाहीर माफी मागितली आहे. आम्हाला हे चुकीचे आहे हे माहीत नव्हते, कृपया आम्हाला माफ करा. कोणीही पुन्हा अशी चूक करू नका, असे आवाहन त्यांनी या व्हिडिओद्वारे केले आहे. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी वडिलांना वस्तू समजणाऱ्या या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 4:46 PM IST
मराठी बातम्या/देश/
व्हायरल होण्यासाठी बापाला पोत्यात भरलं; रीलवेड्या कुटुंबाचं कृत्य पाहून सारेच चक्रावले; पण...








