advertisement

मॅटर्निटी फोटोशूटच्या नादात ३ वर्षांच्या मुलाचा बळी! स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू

Last Updated:

बेंगळुरू नॉर्थ तालुकमध्ये मॅटर्निटी फोटोशूटदरम्यान चरण स्वाती यांचा ३ वर्षांचा मुलगा लक्षमीर पूलमध्ये पडून मृत्यू झाला. मदनाखानहल्ली पोलीस तपास करत आहेत.

फोटो सौजन्य- canva
फोटो सौजन्य- canva
दुसऱ्या बाळाच्या येण्याचा आनंद इतका होता, सगळं भान हरपून गेलं. घरात आनंदाचं वातावरण आणि तो आनंद कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सुरू असलेलं मॅटर्निटी फोटोशूट... पण याच फोटोशूट दरम्यान नियतीने असा काही घात केला, की हे कुटूंब कधीच विसरू शकणार नाही. एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. फोटोशूट सुरू असतानाच ३ वर्षांचा चिमुरडा खेळता खेळता जवळ असलेल्या पूलमध्ये पडला तडफडून मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
बेंगळुरूच्या नॉर्थ तालुक भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. 'लक्षमीर' असं मृत ३ वर्षांच्या मुलाचं नाव आहे. लक्षमीरचे वडील चरण आणि आई स्वाती हे आपल्या दुसऱ्या बाळाच्या येण्याची तयार करत होते. त्यासाठी मॅटर्निटी फोटोशूटचा घाट घातला होता. स्वाती आठ महिन्यांच्या गरोदर होती, हा खास क्षण स्मरणात ठेवण्यासाठी त्यांनी फोटोशूटचं आयोजन केलं होतं.
advertisement
फोटोजच्या नादात काळजाचा तुकडा गमावला
आई-वडील आणि फोटोग्राफर शूटमध्ये व्यस्त असताना, लक्षमीर जवळच खेळत होता. खेळता खेळता त्याचा पाय घसरला आणि तो थेट पाण्याने भरलेल्या पूलमध्ये पडला. विशेष म्हणजे, फोटोशूटच्या गडबडीत मुलाचा आवाज किंवा तो पाण्यात पडल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. काही वेळानंतर जेव्हा मुलाचा शोध सुरू झाला, तेव्हा तो पाण्यात मृतावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेलमंगला शासकीय रुग्णालयात मुलाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून, मदनाखानहल्ली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटोशूट सुरू असताना तिथे सुरक्षेचे काही उपाय होते का? आणि यामध्ये कोणाकडून हलगर्जीपणा झाला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
मॅटर्निटी फोटोशूटच्या नादात ३ वर्षांच्या मुलाचा बळी! स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement