9 जुलैला भारत बंद? बँका, बस सेवा आणि दैनंदिन कामकाजावर होणार मोठा परिणाम

Last Updated:

देशभरात काम करणाऱ्या 25 कोटींपेक्षा जास्त कामगारांनी 9 जुलै रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सध्या देशभरात एक मोठी बातमी चर्चेत आहे. 9 जुलै रोजी देशभरात भारत बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद कुठल्या कारणामुळे आहे? कोणत्या सेवा बंद राहणार? बँकाचं काय? आणि तुमचं रोजचं कामकाज कसं होणार? चला सगळं साध्या भाषेत समजून घेऊया.
का पुकारला आहे भारत बंद?
देशभरात काम करणाऱ्या 25 कोटींपेक्षा जास्त कामगारांनी 9 जुलै रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देश विरोधी कॉर्पोरेट धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.
कोण-कोण सहभागी होणार?
या बंदमध्ये देशातील 10 मोठ्या केंद्रीय कामगार संघटना सहभागी होणार आहेत. जसं की:
INTUC, CITU, AITUC, SEWA, HMS, आणि इतर संघटना.
advertisement
यामध्ये बँक कर्मचारी संघटनाही सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं गेलंय.
बँक सेवा बंद राहणार?
हो. 9 जुलैला देशातील अनेक बँकांचे व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. काही बँका बंद राहतील किंवा कामकाज मर्यादित स्वरूपात होईल. त्यामुळे त्या दिवशी बँकेचे व्यवहार टाळल्येलंच उत्तम.
शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसेस?
शाळा, कॉलेजेस आणि खासगी ऑफिसेस बंद राहणार नाहीत, पण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बस, टॅक्सी आणि कॅब सेवा प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे प्रवास करताना अडचण येऊ शकते.
advertisement
रेल्वे सेवा चालू राहणार?
रेल्वे सेवा बंद होणार नाही, पण काही भागात मोर्चे, रस्ते अडवण्यासारख्या आंदोलनांमुळे रेल्वे विलंब होऊ शकतो.
बंद मागचं मुख्य कारण काय?
कामगार संघटनांचं म्हणणं आहे की त्यांनी सरकारकडे आपली 17 मुद्द्यांची मागणी दिली होती, पण सरकारने अजूनही त्यावर काही ठोस पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे त्यांना आता रस्त्यावर उतरावं लागतंय.
view comments
मराठी बातम्या/देश/
9 जुलैला भारत बंद? बँका, बस सेवा आणि दैनंदिन कामकाजावर होणार मोठा परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement