G20 Summit : G20च्या निमंत्रण पत्रिकेवर इंडियाच्या जागी भारत, हे संविधानाविरुद्ध; काँग्रेसचा आरोप
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आतापर्यंत भारत सरकारच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा वापर केला जात होता. पण पहिल्यांदाच प्रेसिडेंट ऑफ भारत असा शब्द वापरला गेला आहे.
दिल्ली, 05 सप्टेंबर : भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी असा दावा केला की, जी20 परिषदेवेळी भारतात येणाऱ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी राष्ट्रपती भवनात भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. याची निमंत्रण पत्रिका व्हायरल होत असून त्यावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिण्यात आलं आहे. यावर जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे.
जयराम रमेश यांनी म्हटलं की, ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाकडून 9 सप्टेंबरला जी20 निमित्त भोजनाचे आयोजन केले आहे. यासाठी प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत नावाने निमंत्रण दिलं आहे. आता संविधानाच्या अनुच्छेद-1 मध्ये असं म्हटलं जाऊ शकतं जे भारत, जो आधी इंडिया होता, राज्यांचा एक संघ आहे. मात्र आता या राज्यांच्या संघावरही हल्ला होत आहे.
advertisement
So the news is indeed true.
Rashtrapati Bhawan has sent out an invite for a G20 dinner on Sept 9th in the name of 'President of Bharat' instead of the usual 'President of India'.
Now, Article 1 in the Constitution can read: “Bharat, that was India, shall be a Union of States.”…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023
advertisement
आतापर्यंत भारत सरकारच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा वापर केला जात होता. पण पहिल्यांदाच प्रेसिडेंट ऑफ भारत असा शब्द वापरला गेला आहे. जी20 परिषद 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत होणार आहे. या परिषदेसाठी 20 देशांचे सदस्य भारतात येणार आहेत. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी रात्री राष्ट्रपती भवनात भोजन समारंभाचे आयोजन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2023 1:03 PM IST
मराठी बातम्या/देश/
G20 Summit : G20च्या निमंत्रण पत्रिकेवर इंडियाच्या जागी भारत, हे संविधानाविरुद्ध; काँग्रेसचा आरोप