निवडणूक आयोगाची तातडीची पत्रकार परिषद, थेट राहुल गांधींना उत्तर देणार? दिल्लीतील वातावरण तापले

Last Updated:

Election Commission vs Rahul Gandhi: निवडणूक आयोगाची 17 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या मतदार याद्यांमधील गैरव्यवहारवर विरोधी पक्षांकडून विशेषत: राहुल गांधी आणि काँग्रेसकडून आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. या पाश्वभूमीवर आयोगाकडून उद्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी नुकतेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदार यादीतील फेरफार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटर (X) आणि पत्रकार परिषदांमधून थेट टीका करत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
advertisement
त्यांच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आयोगाकडे आक्षेप घेत असताना, भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांना "आधारहीन आणि निवडणुकीपूर्वीची राजकीय नौटंकी" असे संबोधले आहे. मात्र निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेत आयोग निवडणुकीची तयारी, पारदर्शकतेसाठी उचललेली पावले आणि राहुल गांधींसह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर आगामी निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम किंवा महत्वाचे निर्णय जाहीर होण्याचीही दाट शक्यता आहे.
advertisement
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक आयोगावर विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला असून आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/देश/
निवडणूक आयोगाची तातडीची पत्रकार परिषद, थेट राहुल गांधींना उत्तर देणार? दिल्लीतील वातावरण तापले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement