योग शिकायला आली अन् भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडली, जर्मनीची स्टीना झाली रोविता, घेतला मोठा निर्णय
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
संदीप आणि स्टीना या दोघांचा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
कमल पिमोली, प्रतिनिधी
उत्तरकाशी, 11 डिसेंबर : भारतीय संस्कृती ही जगात महान आहे. या संस्कृतीचा जगात आदर केला जातो. अनेक जण भारतीयांशी लग्नही करतात, अशाही बातम्या तुम्ही वाचल्या असतील. यानंतर आता सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीला प्रभावित होऊन जर्मनीची स्टीना हिनेसुद्धा एका भारतीय तरुणाशी लग्न केले आहे.
जर्मनीची स्टीना ही भारतीय परंपरांनुसार लग्नाच्या बंधनात बांधली गेली आहे. तिने उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील संदीपसह लग्न केले. संदीप आणि स्टीना या दोघांचा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. स्टीना आणि संदीप सेमवाल यांचा विवाह उत्तरकाशीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात वैदिक रितीरिवाजाने झाला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. स्टिनाने लग्नानंतर आता हिंदू धर्म स्वीकारला आहे. पर्वतीय परिसरातील तरुणाशी लग्न केल्यानंतर तरुणीने तिचे नाव बदलून रोविता ठेवले.
advertisement
अशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात -
संदीप सेमवाल आणि स्टिना यांची प्रेमकहाणी 2018 मध्ये सुरू झाली होती. जर्मनीतील स्टिना योग शिकण्यासाठी योगनगरी ऋषिकेश येथे आली होती. ज्या आश्रममध्ये 21 वर्षीय स्टिना योग शिकत होती, त्याच आश्रममध्ये संदीपही काम करत होता.
योगगुरुने लग्नासाठी केले प्रेरित -
जेव्हा स्टिना हिने भारतीय संस्कृतीशी प्रभावित झाली तेव्हा तिने आपले योग गुरू आणि त्या आश्रमचे संचालक यांना भारतात राहूनच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर स्टिनाच्या गुरुने संदीप सोबत लग्न करण्याचा सल्ला स्टिनाला दिला आणि स्टिनाला उत्तराखंडमध्ये विवाह करण्यासाठी प्रेरित केले.
advertisement
या दरम्यान, कोरोनाकाळात स्टीना जर्मनीला परत गेली तसेच इकडे त्यांच्या गुरुचेही निधन झाले. पण स्टीना जर्मनीला थांबली असताना तिचे मन अजूनही उत्तराखंडमध्ये रमले होते. यादरम्यान स्टीने आपल्या नातेवाईकांना तिला उत्तराखंडच्या एका तरुणासोबत लग्न करायचे आहे, असे सांगत त्यांचेही मन वळवले. यानंतर स्टीना आपल्या कुटुंबासह उत्तराखंडला परतली आणि तिने संदीप सेमवाल या तरुणाशी लग्न केले.
advertisement
यावेळी उत्तरकाशीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टीना उर्फ रोविताचे कन्यादान करून तिला उत्तराखंडची मुलगी आणि आदर्श सून म्हणून आनंदी आयुष्य मिळावे, असा आशीर्वाद दिला.
भारतीय संस्कृती स्विकारुन स्टीना खूश -
स्टीना म्हणाली, ती उत्तराखंडच्या संस्कृतीचा हिस्सा झाल्यावर तिला खूप आनंद होत आहे. देवभूमी उत्तराखंडच्या कणाकणात देवता निवास करतात. तिला सुरुवातीपासूनच अध्यात्माकडे जायचे होते. त्यामुळे तिने येथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संस्कृती अंगीकारताना तिला खूप आनंद होत आहे. यावेळी वराच्या नातेवाईकांनी नवदाम्पत्याला जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
Location :
Uttarkashi,Uttarkashi,Uttarakhand
First Published :
December 11, 2023 3:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
योग शिकायला आली अन् भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडली, जर्मनीची स्टीना झाली रोविता, घेतला मोठा निर्णय