Guess Who : चेहऱ्यावर जाऊ नका, तिच्या एका इशाऱ्यावर पोलीसांची ही होते बोलती बंद, कोण आहे ही तरुणी?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या फोटोमधील तरुणीची खरी कहाणी काही वेगळीच आहे, ज्याचा विचार तुम्ही हा फोटो पाहून अजिबातच केला नसणार.
बरेली : फोटोमधील ही तरुणी पाहून तुम्हाला काय वाटतं... ती कोण असेल? काय करत असेल? तुम्ही म्हणाल एखादी फूड ब्लॉगर असेल, ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर किंवा मग ब्युटी कंटेंट क्रिएटर, बरोबर ना? पण खरं सांगायचं तर यापैकी कुठलंही उत्तर बरोबर नाही. आश्चर्य म्हणजे या तिच्या एका इशाऱ्यावर पोलीस खातं काम करतं आणि तिच्यासमोर पोलिसांचं काही चालत नाही.
आता असं म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि विचार कराल की ती एखाद्या पॉलिटिशनची मुलगी वगैरे आहे का जे सगळे तिचं ऐकतायत. पण या फोटोमधील तरुणीची खरी कहाणी काही वेगळीच आहे ज्याचा विचार तुम्ही हा फोटो पाहून अजिबातच केला नसणार.
खरंतर ही तरुणी आहे अंशिका वर्मा... IPS अंशिका वर्मा जी सध्या बरेली मधील दंगल नियंत्रण दल सांभाळत आहे.
advertisement
प्रयागराजमध्ये जन्मलेली अंशिकाने इंजिनिअरिंगमध्ये B.Tech (Electronics & Communication) करूनही समाधानी बसली नाही. स्वतःच्या मेहनतीवर यूपीएससी उत्तीर्ण होऊन तिने पोलिस सेवेत पाऊल ठेवलं. वयाने तरुण असली तरी निर्णय क्षणात घेण्याची आणि नेतृत्व करण्याची तिची क्षमता पाहून वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रभावित होतात.
बरेलीमध्ये येऊन अंशिकाने दंगल पथकाची सूत्रं हाती घेतली. फ्लॅग मार्च असो वा धार्मिक सणांच्या काळातली सुरक्षा व्यवस्था. ती स्वतः मोर्चा सांभाळते. तिच्या पुढाकाराने महिला सुरक्षेसाठी “वीरांगना” सारखं महिला कमांडो युनिट तयार झालं, जे शहरात तातडीने कारवाई करतं.
advertisement
अंशिका फक्त कठोर कारवाईसाठीच ओळखली जात नाही, तर तिच्या धाडसी निर्णयामुळेही प्रसिद्ध आहे. अलीकडेच धर्मांतरणाशी संबंधित मोठ्या रॅकेटवर तिने थेट कारवाई केली आणि त्या प्रकरणाची साखळी उलगडत नेली. बरेलीत सुरु असलेलं I LOVE Muhammad आणि त्यामुळे शहरात झालेल्या दंगली रोखण्यासाठी अंशिकाने सगळी सूत्रं हाती घेतली आहेत आणि आता त्यांच्या एका इशाऱ्यावर तेथील पोलीस खातं चालतं. त्या कामात खूपच शिस्तप्रिय आणि कठोर आहेत, त्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर कोणी जात नाही.
advertisement
सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून लोकांना वाटतं ही एक साधी इन्फ्लुएन्सर असेल. पण खरी ओळख समजली की प्रत्येकाला अभिमान वाटतो. IPS अंशिका वर्मा आज बरेलीत ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जातात.
view commentsLocation :
Bareilly,Uttar Pradesh
First Published :
Oct 03, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
Guess Who : चेहऱ्यावर जाऊ नका, तिच्या एका इशाऱ्यावर पोलीसांची ही होते बोलती बंद, कोण आहे ही तरुणी?











