Lionel Messi: ... तर पत्नीलाही Divorce देईन, मेस्सीचा जबरा फॅन सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लिओनेल मेस्सी भारतात आल्यावर कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्लीमध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली. नेपाळहून आलेल्या फॅनचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले.
भारतात फुटबॉलचा देव मानला जाणारा बार्सीलोना सुपरस्टार लिओनेल मेस्सी भारतात आला आहे. त्याला पाहण्यासाठी कोलकाता इथे चाहत्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी एका फॅनने तर चक्क मेस्सीला पाहण्यासाठी मी बायकोला सोडेन तिला डिवोर्स देईन असं वक्तव्य केलं आहे. शनिवारी पहाटे २ वाजून २६ मिनिटांनी मेस्सी भारतात आला आणि फुटबॉलप्रेमासाठी ओळखले जाणारे संपूर्ण शहर अक्षरशः मेस्सीच्या रंगात रंगून गेलं. आपल्या लाडक्या हिरोला पाहण्यासाठी चाहते रात्रभर रांगेत उभे होते, पण या सगळ्यामध्ये एका नेपाळी 'जबरा फॅनची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. .
नेपाळहून आला, म्हणाला, 'बायकोला सोडायलाही तयार!'
मेस्सीच्या स्वागतासाठी आलेल्या याच जबरा फॅनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्याची मेस्सीता तो जबरा फॅन असल्याचं सांगत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, "मी मेस्सीला पाहण्यासाठी नेपाळहून इतक्या दूर आलो आहे. मी माझ्या कुटुंबाचाही उल्लेख करू इच्छितो, ज्यांनी मला येथे येण्याची परवानगी दिली आणि माझे स्वप्न पूर्ण केले..." ...मी मेस्सीला पाहण्यासाठी माझ्या पत्नीला घटस्फोटही देऊ शकतो! त्याचं हे वाक्य ऐकून उपस्थितांना धक्काच बसतो.
advertisement
“ i came all the way from Nepal to see Messi... I also want to mention my family, who permitted me to come here and made my dream come true... I can divorce my wife just to see Messi... I came here from that far away by skipping college to see Messi.”
pic.twitter.com/3Y1U4OuJk1
— MC (@CrewsMat10) December 12, 2025
advertisement
भारताचा ७२ तासांचा दौरा
मेस्सी आणि त्याचे सहकारी पुढील ७२ तासांत भारतातील अनेक प्रमुख शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये जाणार आहेत. हा दौरा केवळ फुटबॉलपुरता मर्यादित नसून, मेस्सी भारताचे मोठे कॉर्पोरेट दिग्गज, बॉलिवूड कलाकार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि सोमवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.
advertisement
कोलकातामध्ये मेस्सीनं 70 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर मात्र 10 मिनिटांतच त्याला मैदाम सोडावं लागलं. प्रचंड गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होता. मेस्सीला भेटता न आल्याने चाहत्यांनी अक्षरश: खुर्च्या फेकल्य़ा, मैदानात मोठं नुकसान केलं, बाटल्या फेकून मारल्या, चाहत्यांनी व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. रात्रभर रांगेत उभं राहून मेस्सीला पाहायला आलेल्या चाहत्यांचा मोठा संताप झाला.
view commentsLocation :
Kolkata [Calcutta],Kolkata,West Bengal
First Published :
December 13, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/देश/
Lionel Messi: ... तर पत्नीलाही Divorce देईन, मेस्सीचा जबरा फॅन सोशल मीडियावर तुफान व्हायरल










