advertisement

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले

Last Updated:

Ballistic Missile: भारताने ओडिशाच्या चांदीपूर येथून ‘अग्नि-3’ या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी करत आपली सामरिक ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. या चाचणीने चीन आणि पाकिस्तानला भारताच्या ठाम आणि सज्ज संरक्षण क्षमतेचा स्पष्ट संदेश दिला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: शुक्रवारी 6 फेब्रुवारीच्या सकाळी भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरून केलेल्या एका प्रचंड धमाक्याने सीमापार बसलेल्या शत्रू देशांच्या बंकरांनाही हादरवून सोडलं आहे. भारताने आपली अत्यंत घातक आणि सामरिक दृष्ट्या महत्त्वाची इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल (IRBM) ‘अग्नि-3’ यशस्वीरीत्या चाचणीसाठी डागली. या यशस्वी चाचणीद्वारे भारताने चीन आणि पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट संदेश दिला आहे. डोळा वर केला, तर घरात घुसून प्रत्युत्तर दिलं जाईल.
ही मिसाइल ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमधून स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडून डागण्यात आली. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीदरम्यान सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष 100 टक्के अचूक आढळून आले. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं हे सामरिक ‘ब्रह्मास्त्र’ आता प्रत्यक्ष युद्धासाठी पूर्णतः सज्ज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
बीजिंग आणि रावळपिंडी ‘डेथ रेंज’मध्ये
या चाचणीनंतर शेजारी देशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मिसाइल केवळ शक्तीप्रदर्शनासाठी नाही, तर तिची मारक क्षमता इतकी प्रचंड आहे की पाकिस्तानचा कोपरा-कोपरा तिच्या रेंजमध्ये येतो. यासोबतच विस्तारवादी धोरण राबवणाऱ्या चीनलाही आता सुरक्षित वाटण्याचं कारण उरलेलं नाही. अग्नि-3 ची क्षमता चीनमधील शांघाय, चोंगकिंगसारख्या महत्त्वाच्या शहरांपर्यंत मारा करण्याची ताकद ठेवते.
advertisement
मध्यम पल्ल्याची घातक बॅलिस्टिक मिसाइल
स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने चांदीपूर येथून ही चाचणी अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, लाँच प्रक्रियेदरम्यान सर्व प्रणाली अपेक्षेप्रमाणे काम करत होत्या. अग्नि-3 ही भारताची मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाइल (IRBM) असून तिचा विकास DRDO ने केला आहे.
अग्नि मालिकेच्या चाचण्या सातत्याने सुरू
अलीकडच्या काळात अग्नि मालिकेतील इतर मिसाइल्स आणि त्यांचे अपग्रेडेड व्हेरिएंट्सही यशस्वीरीत्या चाचणीसाठी डागण्यात आले आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्येही अग्नि-3 चे सामरिक महत्त्व स्वतंत्र आणि निर्णायक आहे. ही मिसाइल दोन टप्प्यांची (Two-stage) असून ती घन इंधनावर (Solid Fuel) कार्य करते. पहिला टप्पा पूर्ण जळल्यानंतर दुसरा टप्पा सक्रिय होतो, ज्यामुळे मिसाइल अधिक स्थिरतेने आणि अचूकतेने लक्ष्याच्या दिशेने पुढे सरकते.
advertisement
अग्नि-3 ची मारक क्षमता किती?
अग्नि-3 ही दोन टप्प्यांची, घन इंधनावर चालणारी बॅलिस्टिक मिसाइल असून ती 1.5 टनांपर्यंत अण्वस्त्र किंवा पारंपरिक वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलची कमाल रेंज 3,500 किलोमीटर आहे. मात्र आतापर्यंत तिच्या 3,000 ते 3,200 किलोमीटर रेंजमध्ये यशस्वी चाचण्या झालेल्या आहेत.
advertisement
वैशिष्ट्ये
अग्नि-3 ची लांबी सुमारे 17 मीटर आहे.
या मिसाइलचे वजन अंदाजे 48 ते 50 टन इतके आहे.
अग्नि-3 मॅक 7 ते 8 वेगाने, म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या 7 ते 8 पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे.
लक्ष्य अचूकतेच्या बाबतीत, तिची Circular Error Probable (CEP) 40 मीटरपेक्षा कमी असल्याचं मानलं जातं, म्हणजेच ती अत्यंत अचूक आहे.
advertisement
शेजारी देशांतील अनेक शहरे टार्गेटमध्ये
अग्नि-3 च्या रेंजमध्ये पाकिस्तानमधील बहुतांश शहरे येतात. चीनच्या बाबतीत बीजिंग थेट रेंजमध्ये नसले, तरी शांघाय, चोंगकिंगसारखी महत्त्वाची शहरे या मिसाइलच्या जदेत येतात. उल्लेखनीय बाब म्हणजे 2006 नंतर अग्नि-3 ची अनेकदा यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. जरी ती अग्नि-4 आणि अग्नि-5 पेक्षा तुलनेने लहान असली, तरी तिची प्रभावी क्षमता आणि सामरिक ताकद प्रचंड आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement