Trump Trade war : भारत-अमेरिका टॅरिफ वादात नवा खुलासा, एक फोन कॉल अन् ट्रम्पचा सूर बदलला, 35 मिनिटात असं काय झालं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Trump Tarrif on India : समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जून महिन्यात तब्बल 35 मिनिटांची फोनवर चर्चा झाली होती.
US Tarrif on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध जाणले गेले आहेत. अमेरिकेने भारतावर थेट 25 टक्के अतिरिक्त टेरिफ लावल्याने दोन्ही देशांमधील कटुता वाढत चालली आहे. नव्या लादण्यात आलेला नवीन टॅरिफ आणि आधीच 25 टक्के टॅरिफ असा एकूण 50 टक्के टॅरिफ भारतावर आकारला जाईल. अशातच आता या वादावरील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
35 मिनिटांची फोनवर चर्चा
भारत आणि अमेरिकेमधील टॅरिफच्या मुद्द्यावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गत जून महिन्यात तब्बल 35 मिनिटांची फोनवर चर्चा झाली होती. या चर्चेनंतरच ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर बदलल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
भारतीय अर्थव्यवस्थेवर टीका
मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या फोन कॉलनंतर अमेरिकेची भूमिका बदलली आणि ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या भारताविरुद्ध तीव्र विधानं करण्यास सुरुवात केली. या आठवड्यात त्यांनी भारतीय निर्यातीवर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली, ज्यापैकी अर्धा भाग रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून आहे. इतकंच नाही तर ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था 'मृत' आणि व्यापार अडथळ्यांना 'घृणास्पद' म्हटलं आहे.
advertisement
अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम
दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या या वाढीव शुल्कामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे, असं मूडीज रेटिंग्जने म्हटले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, यामुळे भारताचा GDP वाढीचा दर 0.3 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. विशेषतः कापड, समुद्री उत्पादने, चामड्याची उत्पादने आणि दागिने यांसारख्या क्षेत्रातील निर्यातीवर याचा मोठा परिणाम होईल, अशी शक्यता आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 09, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/देश/
Trump Trade war : भारत-अमेरिका टॅरिफ वादात नवा खुलासा, एक फोन कॉल अन् ट्रम्पचा सूर बदलला, 35 मिनिटात असं काय झालं?


