9 आणि 10 मेच्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. पण भारतानं लद्दाखपासून भुजपर्यंत तब्बल 45 ड्रोन्स शूट करून हल्ले फोल ठरवले.
जालंधरमधल्या आदमपूर वायुदल स्थानकाजवळ रात्री मोठ्या स्फोटांच्या आवाजामुळे खळबळ माजली. हे ड्रोन हल्ले भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेनं अडवले, पण स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली.
भारताने आज पहाटे दोन पाकिस्तानी फायटर जेट्स पाडलेत. एक श्रीनगरजवळच्या लसजन भागात आणि दुसरा उत्तर काश्मीरमध्ये. हे ऐकून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.
सीमेवर सुरु असलेल्या गोळीबारामुळे डोडा जिल्हा प्रशासनानं रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांना सांगण्यात आलंय की पुढच्या आदेशापर्यंत घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या जात आहेत. सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे.
जम्मूजवळून पाकिस्तानकडून ड्रोन लाँच केले जात होते. भारतीय लष्करानं त्या सगळ्या लाँचपॅड्स आणि पोस्ट्स उद्ध्वस्त केल्या. हे फक्त कारवाई नव्हतं, हे ठोस उत्तर होतं.
पाकिस्तानमध्ये आता परिस्थिती फारच बिघडलीये. इस्लामाबादमध्ये इंधनाची टंचाई झालीये आणि त्यामुळे सगळे पेट्रोल पंप 48 तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिलेत. लोक अक्षरश: घाबरलेत.
पाकिस्तानच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने म्हटलंय की, “आपल्या 6 लाख सैन्याला भारताच्या 16 लाख सैनिकांसमोर उभंही राहता येणार नाही.” आता त्यांना वाटतंय की फक्त अमेरिका किंवा चीनच पाकिस्तानला वाचवू शकतात.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलंय, “IMF पाकिस्तानला बॉम्बसाठी पैसे देतोय का? कारण जे काही पाकिस्तान काश्मीरात करतंय — पूंछ, राजौरी, उरी, तंगधार या सगळ्या भागांवर – ते बघितल्यावर हेच वाटतंय. मग आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटतं तरी काय की या सगळ्यात शांतता येईल?”
पाकिस्तानमध्ये घबराट, सरकारने इस्लामाबादमधील सर्व पेट्रोल पंप ४८ तासांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये इंधनाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
श्रीनगर आणि आसपासच्या भागात पाकिस्तानसोबत जोरदार चकमक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय केली आहे.
जालंधरमधील कांगनीवाल गावात स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले. ड्रोन स्फोटामुळे बाधित झालेल्या घरात राहणाऱ्या सुरजीत कौर म्हणाल्या की, आमच्या घराच्या वर एक लाल रंगाचा फ्लॅश दिसला आणि एक मोठा स्फोट झाला. आम्हाला भीती वाटली. आजूबाजूला अंधार होता. काही वेळाने आम्ही आमच्या घराबाहेर पडलो आणि पाहिले की आमच्या घरांच्या आणि शेजाऱ्यांच्या घरांच्या वरच्या पाण्याच्या टाक्या फुटल्या होत्या. त्यावेळी अंधार पडला होता आणि सर्व दिवे बंद होते.
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानने भारतातील 4 शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकने उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि सिरसामध्ये हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र भारताने पाकड्यांचा हल्ला परतावून लावला आहे. पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय.
पाकिस्तानकडून पुन्हा कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात ऑपेरशन बुनयान उल मर्सूस’ केलं. मात्र पाकिस्तानचा दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दिल्लीत हायअलर्ट देण्यात आला असून सध्या दिल्ली पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेले सगळे हल्ले उधळून लावण्यात आले आहेत. पाकिस्तानचं ऑपरेशन बुनयान उल मर्सूस पूर्णपणे फेल गेल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानकडून भारतावर वारंवार हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता पाकिस्ताननं थेट राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं भारतावर फतेह-2 मिसाईल डागलं. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं चोख प्रत्युत्तर देत हे मिसाईल हवेतच पाडलं. हे मिसाईल हरियाणातील सिरसाजवळ पाडल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतावर हल्ल्याचे पाकचे प्रत्येक प्रयत्न उधळून लावले जाताहेत. भारतानं आपली एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम किती सक्षम आहे याचं वारंवार प्रत्यंतर दाखवून दिलंय.