advertisement

पुन्हा सापडला तर जिवंत सोडणार नाही, बॉर्डरवर पाकिस्तानचा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये हाय-व्होल्टेज सर्च ऑपरेशन

Last Updated:

High Alert on Border: जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने वेळीच उधळून लावला. सुंदरबनी आणि राजौरी परिसरात कारवाई करत सुरक्षा दलांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

News18
News18
काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) पाकिस्तानकडून रचण्यात आलेली घुसखोरीची मोठी योजना उधळून लावली. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमेकडून काही दहशतवादी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भारतीय लष्कराने तात्काळ कारवाई करत ही घुसखोरी यशस्वीपणे हाणून पाडली. हे दहशतवादी नाथुआ टिब्बा परिसरातून भारतीय सीमेत प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असे लष्कराने स्पष्ट केले.
व्हाइट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या अधिकृत हँडल (@Whiteknight_IA) वरून यासंदर्भात माहिती दिली. अचूक गुप्तचर माहिती आणि सततच्या देखरेखीच्या आधारे नाथुआ टिब्बा परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्या. 19 फेब्रुवारी 2026 च्या पहाटे व्हाइट नाईट कॉर्प्सने एलओसीवर वेगवान आणि अचूक प्रत्युत्तरात्मक गोळीबार केला. या कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्यात आला असून, सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
advertisement
एकात्मिक जमिनीवरील आणि हवाई देखरेख प्रणालीद्वारे संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सैनिकांना योग्य ठिकाणी पुनर्स्थापित (री-पोझिशन) आणि सज्ज करण्यात आले आहे. संपूर्ण सेक्टरमध्ये उच्चस्तरीय सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/देश/
पुन्हा सापडला तर जिवंत सोडणार नाही, बॉर्डरवर पाकिस्तानचा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये हाय-व्होल्टेज सर्च ऑपरेशन
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement