जनगणना: 1 एप्रिलपासून तुमच्या घरी येणार अधिकारी; ३३ प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२७ पासून भारताची पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना जाहीर केली असून, ३३ प्रश्नांसह जातीवर आधारित आकडेवारीही गोळा होणार आहे.
केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल २०२७ पासून या ऐतिहासिक महामोहिमेचा बिगुल वाजणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ही प्रक्रिया पूर्णतः 'डिजिटल' स्वरूपात पार पडणार असून, याद्वारे प्रशासकीय कामात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत घरांची यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने ३३ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली असून, यामध्ये जातीवर आधारित आकडेवारीही प्रथमच डिजिटल पद्धतीने एकत्र केली जाणार आहे.
तुमच्या दारावर सरकारचे अधिकारी येणार आहेत. ते तुम्हाला 33 प्रश्न विचारतील त्यांची उत्तरं देणं बंधनकारक आहे. भारताच्या आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली. १ एप्रिल २०२७ पासून या महामोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, ही भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना असणार आहे. गृह मंत्रालयाने३३ प्रश्नांची यादी जाहीर केली असून, यात पहिल्यांदाच जातीवर आधारित आकडेवारीही डिजिटल स्वरूपात गोळा केली जाणार आहे.
advertisement
कशी केली जाणार जणनगणा?
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीत पार पडेल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला त्यांच्या सोयीनुसार ३० दिवसांचा अवधी दिला जाईल. या प्रक्रियेसाठी देशभरात तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार?
इमारत क्रमांक (नगरपालिका/स्थानिक संस्था किंवा जनगणना क्रमांक)
advertisement
जनगणना घर क्रमांक
जनगणना घराचे मुख्य मजले साहित्य
जनगणना घराचे मुख्य भिंतींचे साहित्य
जनगणना घराचे मुख्य छताचे साहित्य
जनगणना घराचा वापर
जनगणना घराचे स्थान
घरगुती संख्या
घरगुतीमध्ये सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
घरप्रमुखाचे नाव
घरप्रमुखाचे लिंग
घरप्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतरांचा आहे का
जनगणना घराचा मालकी हक्काचा नमुना
घराच्या विशेष ताब्यात उपलब्ध असलेल्या निवासी खोल्यांची संख्या
advertisement
घरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या
पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची उपलब्धता
प्रकाशाचा मुख्य स्रोत
शौचालयाची उपलब्धता
शौचालयाचा प्रकार
सांडपाणी निचरा व्यवस्था
आंघोळीच्या सुविधेची उपलब्धता
स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शनची उपलब्धता
स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
रेडिओ/ट्रान्झिस्टर
दूरदर्शन
उपलब्धता इंटरनेट
लॅपटॉप/कॉम्प्युटर
टेलिफोन/मोबाइल फोन/स्मार्टफोन
सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेड
कार/जीप/व्हॅन
घरगुती वापरात असलेले मानक धान्य
advertisement
मोबाइल नंबर (केवळ जनगणनेशी संबंधित संपर्कासाठी)
यावेळी काय असेल 'खास'?
१. जियो-टॅगिंग: पहिल्या टप्प्यात प्रत्येक इमारतीचे जियो-टॅगिंग' केले जाईल, ज्यामुळे नकाशावर घराचे अचूक स्थान कळेल.
२. जातीवर आधारित गणना: कॅबिनेटने यावेळी जातीनिहाय डेटा गोळा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सामाजिक-आर्थिक योजनांचे नियोजन अधिक अचूकपणे करता येईल.
३. मोबाईल ॲपचा वापर: ही गणना कागदावर न होता अँड्रॉइड आणि आयओएस ॲपच्या माध्यमातून केली जाईल.
advertisement
४. सेल्फ इन्युमरेशन : ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा आहे, ते लोक स्वतःहून मोबाईल ॲप किंवा वेब पोर्टलवर आपली माहिती भरू शकतील.
१६ वर्षांनंतरची प्रतीक्षा संपली
भारतात शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. २०२१ ची जनगणना कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडली होती. आता तब्बल १६ वर्षांनंतर होणारी ही जनगणना देशाच्या लोकसंख्येचे वास्तव चित्र समोर आणणार आहे. या मोहिमेमुळे सुमारे १.०२ कोटी 'मानव-दिन' इतका रोजगारही निर्माण होणार आहे. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची पद्धत नसून, तुमच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठीचा हा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळे विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/देश/
जनगणना: 1 एप्रिलपासून तुमच्या घरी येणार अधिकारी; ३३ प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं










