पीएम मोदींनी वचन पूर्ण केलं; आफ्रिकन युनियनला जी20 मध्ये 'असं' मिळालं स्थान, जयशंकर यांनी सांगितली इनसाईड स्टोरी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर शनिवारी आफ्रिकन युनियनला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह जी20 मध्ये स्थान मिळालं आहे.
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : राजधानी दिल्लीमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली जी20 शिखर परिषद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर शनिवारी आफ्रिकन युनियनला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह जी20 चा स्थायी सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवशीय जी20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्येच आफ्रिकन युनियनला जी20 चा स्थायी सदस्य म्हणून मान्यता देण्यात आल्याची घोषणा केली. याबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं की, पीएम मोदी यांनी आफ्रिकन युनियनला G20 मध्ये जागा मिळून देत आपलं वचन पूर्ण केलं.
नेमकं काय म्हणाले एस जयशंकर?
याबाबत बोलताना जयशंकर यांनी म्हटलं आहे की, गेल्या वर्षी बाली शिखर परिषदेच्यावेळी सेनेगलचे राष्ट्रपती मैकी सॉल जे त्यावेळी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष होते. ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ आले. त्यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तसं आश्वासन देखील दिलं होतं. अखेर पीएम मोदींनी आपलं आश्वासन पूर्ण केल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
पंतप्रधानांचं पत्र
जी20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याबाबत या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली होती. यंदा जी 20 चं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 मधील सर्व सदस्य देशांना पत्र लिहीलं होतं. ज्यामध्ये G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळालं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 10, 2023 9:27 AM IST
मराठी बातम्या/देश/
पीएम मोदींनी वचन पूर्ण केलं; आफ्रिकन युनियनला जी20 मध्ये 'असं' मिळालं स्थान, जयशंकर यांनी सांगितली इनसाईड स्टोरी


