advertisement

Delhi-Mumbai Tejas Rajdhani Express News: दिल्ली-मुंबई ट्रेनमध्ये सर्वात मोठी चोरी! आकडा वाचून तुम्हालाही भोवळ येईल

Last Updated:

Delhi-Mumbai Tejas Rajdhani Express News: दिल्ली मुंबई तेजस राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 60 लाख रुपयांची चोरी झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.

दिल्ली-मुंबई ट्रेनमध्ये सर्वात मोठी चोरी
दिल्ली-मुंबई ट्रेनमध्ये सर्वात मोठी चोरी
कोटा, 16 डिसेंबर : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवणारी आहे. राजस्थानमध्ये धावत्या ट्रेनमध्ये चोरीची मोठी घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई तेजस राजधानी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. कोटा रेल्वे स्थानकाजवळ राजधानी एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाची 35 लाखांची रोकड आणि लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेत एकच गोंधळ उडाला. चोरट्यांनी प्रवाशाच्या सामानातून 36 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणि 25 लाख रुपयांचे दागिने लांबवले. याप्रकरणी पीडित व्यक्तीने कोटा जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोटा जीआरपीनुसार, लोहित रेगर असे या घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो दिल्लीतील एका दागिन्यांच्या दुकानात काम करतो. त्याच्या मालकाने त्याला मुंबईला नेण्यासाठी 36 लाख 50 हजार रुपये रोख आणि 25 लाखांचे दागिने दिले होते. शुक्रवारी ते दिल्ली-मुंबई तेजस राजधानी एक्स्प्रेसने मुंबईला जात होते. ट्रेन कोटा स्थानकातून सुटल्यानंतर त्याला रोख रक्कम आणि दागिन्यांनी भरलेली बॅग गायब दिसली.
advertisement
डब्यात अटेंडंटही दिसत नाही
बरीच शोधाशोध करूनही बॅग कुठेच आढळली नाही. यादरम्यान पहिल्या कोचमधील दोन अटेंडंट गैरहजर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तक्रारदाराने ट्रेनमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर इतर प्रवाशांना घटनेची माहिती मिळाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने चोरीला गेल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकजण आपापल्या वस्तू आहेत की नाही हे तपासू लागला.
advertisement
कोटा जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेनंतर पीडित व्यक्तीने कोटा जीआरपी पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण घटनेची माहिती दिली. लोहितच्या तक्रारीवरून जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. मात्र अद्याप चोरट्याचा सुगावा लागलेला नाही. राजधानीसारख्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चोरीची एवढी मोठी घटना घडल्याने जीआरपीलाही धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi-Mumbai Tejas Rajdhani Express News: दिल्ली-मुंबई ट्रेनमध्ये सर्वात मोठी चोरी! आकडा वाचून तुम्हालाही भोवळ येईल
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement