Krishna Janmashtami: महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या कृष्णा नदीचा कृष्णाच्या जीवनाशी कसा आहे संबंध?

Last Updated:

हिंदू पौराणिक कथांमध्ये कृष्णा नदीला विष्णूचा अवतार मानतात. Krishna Janmashtami आणि दहीहंडीनिमित्त श्रीकृष्णाच्या आयुष्याशी ही नदी कशी जोडली गेली आहे हे वाचा. काय आहे नदीचं ऐतिहासिक आणि समकालीन महत्त्व?

News18
News18
बंगळुरू:  कृष्णा नदी ही भारतीय द्वीपकल्पातील सर्वात महत्त्वपूर्ण नद्यांपैरी एक आहे. महाराष्ट्रात उगम पावून दक्षिणेकडे वाहणारी ही जीवनदायिनी दक्षिण भारताचा प्रदेश सुजलाम सुफलाम करते. या नदीला कृष्णा नाव कसे मिळाले? या नदीचा श्रीकृष्णाच्या आयुष्याशी कसा संंबंध आहे? आजच्या काळात या नदीचं महत्त्व काय या सगळ्याची माहिती देत आहोत - कृष्णजयंती, जन्माष्टमी आणि अर्थातच दहीहंडीच्या निमित्ताने...
देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातून सुमारे 1400 किलोमीटर (870 मैल) एवढा प्रवास कृष्णा नदी करते आणि अखेर बंगालच्या उपसागाला मिळते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण राज्यांमध्ये शेती, उद्योग आणि लाखो लोकांना पाणीपुरवठा करते म्हणून तिचं महत्त्व आहे.
कृष्णा नदीच्या उगमस्थानापासून, प्रवाहापर्यंत, धरणांपर्यंत, प्रकल्पांपर्यंत आणि उपनद्यांपर्यंतच्या तपशिलांमध्ये जाऊ या.
हिंदू पौराणिक कथांमध्ये कृष्णा नदीला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. सावत्रीने त्रिमूर्तीला दिलेल्या शापातून या नदीची निर्मिती  झाली असं मानलं जातं. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला कृष्णेचे उगमस्थान आहे. ही गंगा आणि यमुना नद्यांप्रमाणे भारताच्या पवित्र नद्यांपैकी एक म्हणून पूजनीय आहे आणि भगवान कृष्णाचे नाव ही नदी धारण करते. पुराणिक ग्रंथ सुचवतात की कृष्णा नदीत स्नान करणे लोकांना त्यांच्या पूर्वजन्मच्या पापांपासून आणि अपवित्रतेपासून शुद्ध करू शकते, ज्यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित होते.
advertisement
श्रीकृष्णाचं बालपण प्रामुख्याने उत्तर भारतात यमुनेच्या काठावर गेलेलंं असलं तरी श्रीकृष्णाने आपल्या आयुष्याचाा महत्त्वाचा काळ कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर व्यतीत केला, अंशी कृष्णभक्तांची श्रद्धा आहे. कृष्णाने केलेले अनेक दैवी चमत्कार या नदीच्या काठी किंवा नदीखोऱ्यात केलेले असल्याच्या पुराणकथा लोकप्रिरि आहेत. गोवर्धन पर्वत उचलला, बकासुर राक्षसाला पराजित केेेलं आणि कालिया नागाची शापमुक्तता अशा अनेक कथा या नदीच्या साक्षीने घडल्याचं काही जण मानतात.
advertisement
ऐतिहासिकदृष्ट्या, कृष्णा नदी खोरे भारतीय इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे. वैदिक काळानंतर सातवाहन, विजयनगर आणि काकतीय साम्राज्ये यासह अनेक प्राचीन संस्कृती या नदीच्या खोऱ्यात बहरल्या. या संस्कृतींना नदीच्या पाण्याने समृद्ध केले. आजही धार्मिक विधींसाठी कृष्णेचे पाणी पवित्र मानले जाते. महाराष्ट्रात अनेक तीर्थस्थानं कृष्णेकाठी आहेत.
कृष्णा नदी उत्तरेस सह्याद्री, बालाघाट रांगा आणि पूर्वेस पूर्व घाटांनी वेढलेली आहे. बंगालच्या उपसागरात ही नदी समुद्राला मिळते. तिच्या मुखाचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. खोऱ्याचा 75.86 टक्के इतका भाग शेतीजमिनीने व्यापलेला आहे.
मराठी बातम्या/देश/
Krishna Janmashtami: महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या कृष्णा नदीचा कृष्णाच्या जीवनाशी कसा आहे संबंध?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement