मोहरीच्या पिकांवर फोफावतोय रोग; चिंता नको, 'असा' करा उपाय!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
लीफ मायनर रोगामुळे मोहरीच्या पानांवर पांढऱ्या रेषा तयार होतात. ज्यामुळे मोहरीचं उत्पादन कमी होतं आणि झाडाला कमकुवत बिया येतात. शिवाय त्यातून तयार होणाऱ्या तेलाचं प्रमाणही कमी असतं.
मोहित शर्मा, प्रतिनिधी
करौली, 28 नोव्हेंबर : स्वयंपाकघरात मोहरीची फोडणी दिली की, संपूर्ण घरभर घमघमाट होतो. कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, असे अनेक पदार्थ आहेत ज्यांचा स्वयंपाकात प्रामुख्याने उपयोग केला जातो. शिवाय त्यांची लागवड अगदी आपल्या खिडकीत किंवा दारात करता येते. मोहरी तर शेतकऱ्यांसाठी काळं सोनं मानलं जातं. या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळतं. शिवाय मोहरीच्या पिकांना किडी आणि रोगांचा धोकाही कमी असतो, परंतु सध्या शेतकऱ्यांमध्ये याबाबत चिंतेचं वातावरण आहे.
advertisement
राजस्थानच्या करौली भागातील मोहरीच्या उत्पादनावर सध्या लीफ मायनर नावाचा रोग फोफावतोय. या रोगामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. लीफ मायनरचा प्रादुर्भाव सुरुवातीला मोहरीच्या पानांवर दिसून येतो, त्यानंतर हळूहळू बियांचंही नुकसान होऊ शकतं. मात्र शेतकऱ्यांनी याबाबत चिंता करण्याचं कारण नाही, कारण यावरही रामबाण उपाय आहे.
advertisement
लीफ मायनर रोगामुळे मोहरीच्या पानांवर पांढऱ्या रेषा तयार होतात. ज्यामुळे मोहरीचं उत्पादन कमी होतं आणि झाडाला कमकुवत बिया येतात. शिवाय त्यातून तयार होणाऱ्या तेलाचं प्रमाणही कमी असतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही कीड दिसायला एखाद्या लहान माशीसारखी असते. जी मोहरीच्या पानांवर अंडी देते. ही अंडीच मोहरीसाठी घातक ठरतात.
advertisement
यावर उपाय असा की, डायमेथोएट, लेम्डासायहेलोथी आणि सायबरमैथ्रीरीन हे प्रति लिटर 1 एमएल पाण्यात मिसळून मोहरीच्या पिकांवर शिंपडावं. त्यामुळे लीफ मायनरचा धोका मोहरीच्या पिकांना कमी असतो. परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
दरम्यान, मोहरीच्या बियांमध्ये असलेलं तेल मानवी शरिरासाठी उपयुक्त असतं. तर, मोहरीच्या हिरव्या कोवळ्या पानांची भाजीही आरोग्यासाठी उत्तम असते. मोहरीत भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क असतं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Karauli,Rajasthan
First Published :
November 28, 2023 9:26 AM IST