फलटणनंतर आता राजधानी हादरली! सैन्यातील लेफ्टनंटचा सरकारी डॉक्टरवर ड्रग्ज देऊन अत्याचार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताज असतानाच राजधानीतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Man Faked Identity As Army Officer : सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. साताऱ्याच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या करत स्वतःच जीवन संपवलं आहे. हे प्रकरण ताज असतानाच राजधानीतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री, लग्नाचे आश्वासन आणि त्यानंतर बलात्काराचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 27 वर्षीय तरुणाने कथित लष्करी लेफ्टनंट असल्याचे भासवून सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला फसवले. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीची खरी ओळख उघड झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरु आहे.
खोटी ओळख मग केली फसवणूक
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव आरव मलिक असे आहे, जो दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर भागात राहतो आणि एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. त्याची आणि महिला डॉक्टरची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यांच्या संभाषणादरम्यान, आरोपीने स्वतःची ओळख भारतीय लष्करी अधिकारी म्हणून करून दिली आणि सतत महिलेशी संपर्कात राहिला.
advertisement
ही महिला डॉक्टर दिल्लीतील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात काम करते. चौकशीदरम्यान असे उघड झाले की आरव मलिकने दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरातील एका दुकानातून लष्कराचा गणवेश खरेदी केला होता. त्याने पीडितेला गणवेश घातलेले स्वतःचे फोटो पाठवून दिशाभूल केली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की आरोपीचा भारतीय सैन्याशी कोणताही संबंध नव्हता आणि त्याने खोटी ओळखपत्र स्वीकारले होते.
advertisement
सोशल मीडियाद्वारे ओळख
पोलिस उपायुक्त अमित गोयल म्हणाले की, आरोपीने 30 एप्रिल ते 27 सप्टेंबर दरम्यान इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे महिला डॉक्टरशी नियमितपणे संपर्क साधला. तिचा विश्वास मिळवण्यासाठी त्याने स्वतःला सीमा अधिकारी म्हणून ओळख दिली आणि भावनिक संबंध निर्माण केला. आरोपीने डॉक्टरच्या घरीही अनेक वेळा भेट दिली. एकदा त्याने तिला ड्रग्ज दिले.
advertisement
ड्रग देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
त्यानंतर त्याने तिला शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केली. हे सर्व अखंड सुरु राहिले. पीडितेने जेव्हा जेव्हा प्रतिकार केला तेव्हा तो तिला ब्लॅकमेल करायचा आणि धमकावायचा. 16 ऑक्टोबर रोजी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64(1) (बलात्कार), 351 (गुन्हेगारी धमकी), 319 (फसवणूक) आणि 123 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
advertisement
पोलिसांनी दिली माहिती
view commentsपोलिसांनी कारवाई करत आरोपी आरव मलिकला अटक केली. चौकशीनंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. हे प्रकरण सोशलमीडियावरील बनावट ओळख आणि विश्वासाचा गैरवापर यांचे गंभीर उदाहरण आहे. तपासाचा भाग म्हणून आरोपीचा मोबाईल फोन आणि डिजिटल चॅट्स फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी लोकांना ऑनलाइन मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 1:10 PM IST
मराठी बातम्या/देश/
फलटणनंतर आता राजधानी हादरली! सैन्यातील लेफ्टनंटचा सरकारी डॉक्टरवर ड्रग्ज देऊन अत्याचार


