गंगेत स्नान करुन घरी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, टँकर टेम्पोची धडक, 8 जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Patna मध्ये फतुहा येथून गंगा स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भरधाव टँकरने धडक दिली, 8 मृत, 4 जखमी, टँकर ड्रायव्हर फरार, पोलिस तपास सुरू.
शनिवार घातवार ठरला, गंगेत स्नान करुन घरी परतणाऱ्या भाविकांना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गंगा स्नान करुन घरी येत असताना भरधाव टँकरने धडक दिली आणि होत्याचं नव्हतं झालं. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोचा अक्षरश: चुरा़डा झाला आहे. टेम्पोचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. भरधाव तेलाच्या टँकरने भाविकांनी भरलेल्या टेम्पोला धडक दिली आणि घात झाला.
या भीषण अपघातानंतर बराच वेळा वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर मृतदेह आणि रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारची राजधानी पटना इथे घडली आहे.
advertisement
Patna city: हाईवा और ऑटो की जोरदार में 8 लोग की मौत..
4 लोग गंभीर रूप से घायल.. नालंदा के मलामा के रहने वाले थे सभी pic.twitter.com/MrhQX1qDNL
— News18 Bihar (@News18Bihar) August 23, 2025
मिळालेल्या माहितीनुसार फतुहा इथून हे गंगा स्नान करुन परत येत असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. टँकरचे ब्रेक फेल झाले होते का? हा अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समोर आलं नाही. मृतांमध्ये 7 महिला आणि एक पुरुष समावेश आहे. कुटुंबियांनी या दुर्घटनेनंतर टाहो फोडला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर टँकर ड्रायव्हर फरार झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/देश/
गंगेत स्नान करुन घरी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, टँकर टेम्पोची धडक, 8 जणांचा मृत्यू