PM Modi Exclusive Interview : जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा भारतात G20 साठी दृष्टी काय होती?

Last Updated:

तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी नागरिक हिच आपली ताकद असल्याचंही पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

News18
News18
मुंबई, 6 सप्टेंबर : पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेआधी सर्वात मोठी आणि EXCLUSIVE मुलाखत मनी कंट्रोल डॉट कॉमला देण्यात आली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताची भूमिका महत्वाची असून G-20मुळे भारताची ताकद वाढतेय असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी नागरिक हिच आपली ताकद असल्याचंही पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
जी20 मुळे भारताचं सामर्थ्य वाढलं असून वैश्विक समस्याचं निराकरण गरजेचं आहे, जगात भारताच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व असून आमच्या G20 च्या भूमिकेला जागतिक समर्थन असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सरकारनं देशातील जनतेचं जगणं सुखकर केलं आहे.
लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून महागाई रोखण्यासाठीही अनेक पावलं उचलल्याचं मोदींनी म्हटलंय. यासाठी घरगुती सिलेंडरच्या दरात मोठी कपात केल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
भारताचा विकास हा जगभरातील देशांसाठी महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच भारताचा विकास हा जनतेला केंद्रस्थानी ठेवून सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सबका साथ, सबका विकास हाच मंत्र ठेवून सरकार काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जग भारताकडे आशेनं पाहातंय असून जी20 मुळं भारताचं सामर्थ्य जगात वाढलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
'वसुधैव कुटुंबकम हा जी20चा सिद्धांत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांची ही EXCLUSIVE आणि पहिली डिजिटल मुलाखत मनी कंट्रोल डॉट कॉम या साईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
जर तुम्ही G20 साठी आमचे ब्रीदवाक्य पाहिले तर ते आहे ‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य’. हे G20 अध्यक्षपदाकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन योग्यरित्या दर्शवतं. आपल्यासाठी, संपूर्ण ग्रह एका कुटुंबासारखा आहे. कोणत्याही कुटुंबात, प्रत्येक सदस्याचे भविष्य प्रत्येक सदस्याशी खोलवर जोडलेलं असतं. म्हणून, जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण एकत्र प्रगती करतो, कोणालाही मागे न ठेवता.
advertisement
पुढे, हे सर्वज्ञात आहे की गेल्या 9 वर्षांमध्ये आपण आपल्या देशात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि विकासाची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आमच्या या प्रयत्नाला जगभरात मान्यता मिळाली आहे.
advertisement
जागतिक संबंधांमध्येही हेच आमचे मार्गदर्शक तत्त्व आहे.
सबका साथ - आपल्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या सामूहिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणणं.
सबका विकास – प्रत्येक देश आणि प्रत्येक प्रदेशात मानव-केंद्रित विकास करणं.
सबका विश्वास – त्यांच्या आकांक्षा ओळखून प्रत्येक भागधारकाचा विश्वास जिंकणं.
सबका प्रयास – प्रत्येक देशाच्या अद्वितीय सामर्थ्याचा आणि कौशल्याचा वापर जागतिक हितासाठी करणं
view comments
मराठी बातम्या/देश/
PM Modi Exclusive Interview : जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा भारतात G20 साठी दृष्टी काय होती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement