PM Modi : दिल्ली म्हणजेच हिंदुस्थान असं समजणाऱ्यांची मला अडचण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

Last Updated:

PM Narendra Modi Interview G20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनी कंट्रोलला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

पीएम नरेंद्र मोदी
पीएम नरेंद्र मोदी
PM Modi Interview to Moneycontrol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनी कंट्रोल डॉट कॉमला जी २० परिषदेआधी मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं की, भारतात जी- 20 शिखर संमेलनात 'जनतेची अध्यक्षता' असावी. देशभरातील डझनभर शहरांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेय. जेणेकरून G-20 चे प्रतिनिधी भारतातील चैतन्य आणि विविधता पाहू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनी कंट्रोलच्या मुलाखतीत म्हणाले की, 'मला अशा लोकांची अडचण होते, जे विचार करतात की, दिल्लीच हिंदुस्थान आहे. यामुळे संपूर्ण देशभरात जी-20 बैठकांचं आयोजन करण्यात आलं.' राज्यांमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता असली तरी या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी सर्वजण एकमेकांशी स्पर्धा करतात.
आता इतर देश जसे की, ब्राझील किंवा अमेरिका देखील भविष्यात जी-20 शिखर संमेलनाचे आयोजन करतील. त्यांच्यासाठी ही पद्धत अवलंबणे खूप कठीण ठरु शकते. भारताने एका अनोख्या पद्धतीने जी-20 ची अध्यक्षता पुढे वाढवली आहे. ज्यामध्ये सदस्य देशांच्या प्रतिनिधींना उत्कृष्ट चव आणि विलासी अनुभवांची संपूर्ण सीरीज ऑफर केली गेली आहे, जे भारताचे खरे स्वरूप आहे. बुधवारी एका दुर्गम गावातील एका लहान मुलीने मनगटावर 'G20 राखी' बांधली तेव्हा पंतप्रधान मोदींना हे स्पष्ट झाले. तिने ही राखी स्वतः बनवली होती आणि तिला समजले होते की G-20 हा कोणत्याही मोठ्या व्यक्तींसाठी नसून हा सर्वांचा कार्यक्रम आहे.
advertisement
अगदी कट्टर टीकाकारही पंतप्रधान मोदींच्या अनुभवाने प्रभावित
अर्धशतकापूर्वी सार्वजनिक जीवनात आपली कारकीर्द सुरू करणारे पंतप्रधान मोदी म्हणतात की, वेळ आणि अनुभव हे त्यांचे सर्वात मोठे शिक्षक आहेत. 1972 मध्ये ते जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेचे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ता) बनले. भ्रमणशील नरेंद्र मोदी यांनी देशातील 90 टक्के जिल्ह्यांमध्ये किमान एक रात्र काढली आहे आणि जीवनातील सर्व गोष्टी पाहिल्या आहेत आणि आत्मसात केल्या आहेत. पंतप्रधान मोदींचे कट्टर टीकाकारही अनिच्छेने कबूल करतात अनुभवाच्या बाबतीत पंतप्रधान मोदींसारखे कोणी नाही.
advertisement
देशातील विविधता समोर आणण्यासाठी मोठ्या संधींचा उपयोग
पीएम मोदींनी मुलाखतीत सांगितले की, 'मी वास्तवाप्रती एक अतिशय जिवंत व्यक्ती आहे. एक अशी व्यक्ती जी जीवनात अनेक अनुभवांमधून गेलेली आहे. म्हणून, माझे निर्णय इतर स्त्रोतांकडील डेटा व्यतिरिक्त अधिकृत माहितीवर आधारित आहेत. माझ्या निर्णयाचा एक मोठा भाग 'ताज्या माहिती'वर आधारित आहे. त्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करणे कितपत व्यवहार्य आहे यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांचा आणि सरकारमधील अधिकाऱ्यांचा सल्ला घेतो.' पंतप्रधान मोदींनी भारतातील विविध आकर्षणे दाखवण्यासाठी मेगा इव्हेंट्सचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांनी असं केलं आहे.
advertisement
देशाच्या प्रत्येक भागात आयोजित केले त्यांचे कार्यक्रम
पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, वाराणसीमध्ये जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे आणि बेंगळुरूमध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचे स्वागत केले होते. गेल्या अनेक वर्षात त्यांनी विज्ञान भवनाचा वापर काही मोजके कार्यक्रम वगळता मोठ्या जागतिक कार्यक्रमांसाठी केलेला नाही. जे पूर्वीच्या सरकारांच्या काळात अनेक राज्यांच्या दौऱ्यांचे मुख्य केंद्र असायचे. म्हणूनच पंतप्रधान मोदी म्हणतात, 'ज्या लोकांना फक्त दिल्ली हाच हिंदुस्थान वाटतो, त्यांची मला अडचण आहे.' त्यांनी आपले कार्यक्रम भारताच्या प्रत्येक भागात नेले आहेत, म्हणून त्यांनी देशाच्या प्रत्येक भागाला जगाच्या कोपऱ्यांमध्ये नेतेल आहे.
advertisement
जागतिक नेत्यांना पारंपारिक भेटवस्तू
पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांना भारताच्या विविध भागात बनवलेल्या आलिशान वस्तू भेट दिल्या आहेत. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशचे कांगडा लघु पेंटिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना भेट म्हणून देण्यात आले होते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 'माता नी पछेडी' देण्यात आले. जो गुजरातच्या भटक्या लोकांनी हातांनी बनवलेला कापडाचा तुकडा असतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील नेत्यांना मी काहीही भेट देऊ शकलो असतो आणि त्यांना आनंद झाला असता. पण मी माझा एक-जिल्हा-एक-उत्पादन उपक्रम अनेक जागतिक नेत्यांकडे नेला. ज्यामुळे जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान वाटला.
view comments
मराठी बातम्या/देश/
PM Modi : दिल्ली म्हणजेच हिंदुस्थान असं समजणाऱ्यांची मला अडचण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement