PM Narendra Modi : जागतिक नेत्यांचा भारताबद्दल प्रतिसाद कसा असतो? पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जी२० च्या निमित्ताने जागतिक नेते भारतात येत आहेत. त्यांचा भारताबद्दलचा दृष्टीकोन कसा आहे? नेते भेटतात तेव्हा ते कसा प्रतिसाद देतात असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता.
दिल्ली, 06 सप्टेंबर : जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीकंट्रोल डॉट कॉमला मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर राहुल जोशी, संतोश मेननन, कार्थिक सुब्बारामन आणि जावेद सयद यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी उत्तरे दिली. जी20 च्या निमित्ताने जागतिक नेते भारतात येत आहेत. त्यांचा भारताबद्दलचा दृष्टीकोन कसा आहे? नेते भेटतात तेव्हा ते कसा प्रतिसाद देतात असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता. यावर भारताबद्दल जागतिक नेते सकारात्मक असल्याचं मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत कोरोना काळात भारताने केलेल्या कामगिरीचाही उल्लेख केला. कोरोना काळात गरीब लोकांची काळजी भारताने घेतली. १५० हून जास्त देशांना आपण कोरोना लस आणि औषधे दिली. ९ वर्षांपासून एका धोरणावर सरकार चालत आहे. सबका साथ, सबका विकास हेच आमचं धोरण आहे आणि जगानेही हे स्वीकारलंय. जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे. जी२० अध्यक्ष म्हणून बायो फ्यूल एलायन्स सुरू करत आहे. बायो फ्यूल एलायन्समुळे अर्थव्यवस्था आणखी भक्कम होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
advertisement
कोरोनामुळे निर्माण झालेली संघर्षाची स्थिती आणि या पार्श्वभूमीवर भारताकडे जी२० परिषदेचं अध्यक्षपद आलं आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाने जगाला अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या युगात ढकललंय. मात्र गेल्या काही वर्षात जगाचे भारताच्या प्रगतीकडे लक्ष आहे. आर्थिक सुधारणा, बँकिंग सुधारणा, सामाजिक क्षेत्रातली क्षमता, स्वच्छता याशिवाय मूलभूत गरजा अन् पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक याचं स्वागत जगभरातून झालं. जागतिक गुंतवणूकदारही एफडीआयमध्ये गुंतवणूक करत भारतावर विश्वास दाखवत आहेत.
advertisement
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने गेल्या ९ वर्षात वेगवेगळ्या उपक्रमातून विविध देशांना एकत्र आणण्यास इच्छुक असल्याचं दाखवून दिलं. भारताच्या कामगिरीमुळे जगात देशाच्या क्षमतावर विश्वास बसला आणि भारताकडे जी२० चे अध्यक्षपद आले असंही मोदींनी सांगितलं. जी२० साठी भारताने जेव्हा अजेंडा मांडला तेव्हा त्याचे स्वागत झाले. आपण जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सक्रीय आणि सकारात्मक दृष्टीकोन आणू शकतो हे जगाला माहिती होतं. जी२० अध्यक्ष म्हणून एक बायो फ्यूल एलायन्स सुरू करत असून त्यामुळे देशांना त्यांच्या उर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करेल.
advertisement
जगभरातील नेते भेटतात तेव्हा ते भारताबद्दल सकारात्मक बोलत असतात असंही मोदींनी सांगितलं. देशातील १४० कोटी नागरिकांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामामुळे, प्रयत्नामुळे जागतिक नेते हे आशावादाने भरलेले असतात. भारताकडे देण्यासारखं खूप काही आहे याची त्यांना खात्री आहे. जागतिक भविष्य घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असंही त्यांना वाटतं. जी२०च्या व्यासपीठावर आपल्या कार्याला जागतिक नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या समर्थनातही त्यांचा भारतावर असलेला विश्वास दिसून येतो असं मोदींनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2023 9:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
PM Narendra Modi : जागतिक नेत्यांचा भारताबद्दल प्रतिसाद कसा असतो? पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर


