Election Commission On Rahul Gandhi : राहुल गांधींचा व्होट चोरीचा आरोप, निवडणूक आयोगाने तासाभरातच उत्तर दिलं, ''मतदारयादीत जर...''

Last Updated:

Election Commission On Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर काही वेळेतच केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

राहुल गांधींचा व्होट चोरींचा आरोप, निवडणूक आयोगाने तासाभरातच उत्तर दिलं, ''मतदारयादीत जर...''
राहुल गांधींचा व्होट चोरींचा आरोप, निवडणूक आयोगाने तासाभरातच उत्तर दिलं, ''मतदारयादीत जर...''
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत मतचोरीचा आरोप आज काही गौप्यस्फोट केले. राहुल गांधी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर काही वेळेतच केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने कोणतेही अपील दाखल केले नव्हते. जर राहुल यांना काही चिंता असती तर ते त्यावेळी त्यांचे मत मांडू शकले असते.
हरियाणाच्या ९० विधानसभा जागांवर उच्च न्यायालयात फक्त २२ निवडणूक याचिका प्रलंबित आहेत. नियमांनुसार, कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार मतदार यादीत किंवा निवडणुकीत अनियमितता असल्याचे मानत असल्यास तो अपील दाखल करू शकतो, परंतु काँग्रेस पक्षाने एकही अपील दाखल केलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement

निवडणुकीतील गोंधळाबाबत निवडणूक आयोगाने काय सांगितले?

नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवाराला निवडणूक निकालांबद्दल प्रश्न असेल तर तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो. हरियाणा निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात २२ अपील प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रांवर काय करत होते असा प्रश्नही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विचारला. जर एखाद्या मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा मतदान एजंटला मतदाराच्या ओळखीबद्दल शंका असेल, तर त्यांनी आक्षेप नोंदवायला हवा होता, असेही त्यांनी म्हटले.
advertisement

बोगस मतदारांबद्दल निवडणूक आयोगाने काय म्हटले?

बोगस मतदारांबद्दल निवडणूक आयोगाने काँग्रेसलाच उलट सवाल करताना म्हटले की, काँग्रेसच्या बीएलए यांनी मतदारयादीवर आपला आक्षेप का नोंदवला नाही. जरी हे बनावट मतदार असले तरी, त्यांनी भाजपला मतदान केले असे कसे म्हणता येईल? असा सवालही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
view comments
मराठी बातम्या/देश/
Election Commission On Rahul Gandhi : राहुल गांधींचा व्होट चोरीचा आरोप, निवडणूक आयोगाने तासाभरातच उत्तर दिलं, ''मतदारयादीत जर...''
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement