पाण्याच्या अभावामुळे पारंपरिक शेती सोडली, फुलवला बगीचा; 3 बिघ्यात केली 4 लाखांची कमाई
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सुरुवातीचं संपूर्ण एक वर्ष त्यांनी ही बाग तयार करण्यात वेचलं. त्यांनी जागेचा अंदाज घेऊन हळूहळू सर्व झाडं लावली. तर, त्याच्याच दुसऱ्या वर्षात त्यांना तब्बल 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.
कालू राम जाट, प्रतिनिधी
दौसा, 15 ऑगस्ट : नोकरी की शेती? असा प्रश्न विचारल्यास मोठ्या संख्येने तरुणांची पसंती शेतीला असते. मात्र आता कुठेतरी या परंपरागत विचारसरणीला छेद देऊन अनेक तरुणमंडळी कृषी क्षेत्राकडे वळत असल्याचं पाहायला मिळतं. शेतीत विविध प्रयोग करून हे शेतकरी लाखोंचं उत्पन्न मिळवतात. अशाच एका यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.
advertisement
राजस्थानच्या धुलारावजी भागातील एका शेतकऱ्याने ठरवलं की, 'आपल्या 3 बीघे जमिनीत खर्च कमी होईल, पाणी कमी लागेल आणि उत्पन्न जास्त मिळेल असं उत्पादन घ्यायचं.' याबाबत माहिती मिळवल्यानंतर त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. त्यांनी 3 बीघे जमिनीत आवळ्याची 300 झाडं लावली आणि एक छान बगीचा तयार केला. या बागेतून आज ते लाखो रुपये कमवत आहेत.
advertisement
दुर्गा लाल सैनी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या बागेला आता 10हून अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षात बाग छान बहरली असून त्यांना आवळ्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळतं. सुरुवातीचं संपूर्ण एक वर्ष त्यांनी ही बाग तयार करण्यात वेचलं. त्यांनी जागेचा अंदाज घेऊन हळूहळू सर्व झाडं लावली. तर, त्याच्याच दुसऱ्या वर्षात त्यांना आवळे विक्रीतून तब्बल 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. त्यानंतर त्यांच्या प्रगतीला कधी ब्रेक लागला नाही. मेहनतीच्या जोरावर त्यांची प्रगती होतच राहिली.
advertisement
सुरुवातीला त्यांना या बागेसाठी 30 हजार रुपयांचा खर्च आला. परंतु त्यानंतर मात्र त्यांना एकही रुपया खर्च करावा लागला नाही. लोक त्यांच्याकडून खाण्यासाठी आवळे घेऊन जातातच, मात्र लोणचं बनवण्यासाठी त्यांच्या आवळ्यांना प्रचंड मागणी असते. त्यांच्या बागेतल्या आवळ्यांचं अतिशय रुचकर लोणचं बनतं, असं त्यांचे ग्राहक सांगतात. महत्त्वाचं म्हणजे लोणचं व्यापारीदेखील त्यांच्याकडून आवळे घेऊन जातात.
advertisement
दुर्गा लाल सैनी म्हणाले, आवळ्याच्या शेतीत जास्त पाण्याची आवश्यकता नसते. शिवाय सुरुवातीलाच खर्च करावा लागतो, नंतर चांगला नफा मिळतो. ते स्वतः आता या बागेतून 4 लाखांचं वार्षिक उत्पन्न मिळवतात. दरम्यान, आवळ्याची शेती ही कमी खर्चिक असते आणि त्यासाठी जास्त वेळही द्यावा लागत नाही, असं ते म्हणाले.
Location :
Rajasthan
First Published :
August 15, 2023 11:04 AM IST
मराठी बातम्या/देश/
पाण्याच्या अभावामुळे पारंपरिक शेती सोडली, फुलवला बगीचा; 3 बिघ्यात केली 4 लाखांची कमाई