सरकारी नोकरी सोडून धरली शेतीची वाट; लढवली भन्नाट शक्कल, आता होतेय बंपर कमाई

Last Updated:
ते घरीच मोहरीचं तेल काढून, हळदीची पावडर बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. शिवाय कोणत्याही रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळते.
1/5
आवड आणि निवड यात फरक असतो असं म्हणतात. निवडलेल्या क्षेत्रात आवड निर्माण करण्यापेक्षा आवडलेल्या क्षेत्राची निवड करणं कधीही बरं, असं म्हटलं जातं. राजस्थानच्या झुंझुनू भागातील कारी गावचे रहिवासी बलबीर धायल यांनीदेखील हाच विचार जोपासला. त्यांनी आपली विद्युत क्षेत्रातली सरकारी नोकरी सोडून चक्क शेतीची वाट धरली.

advertisement
2/5
नोकरी की शेती? असा प्रश्न विचारल्यावर कदाचित अनेकजण नोकरी हाच पर्याय निवडतील. मात्र या परंपरागत विचारांना छेद देऊन बलबीर यांनी शेतीबाबत असलेली आपली आवड जोपासण्याचा निर्णय घेतला.

3/5
पारंपरिक शेतीस सुरुवात केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती करायचं ठरवलं. आज ते मोहरी, शेंगदाण्यांसह लाल मिरची, हळद, धणे, इत्यादी मसाल्यांचं उत्पादन घेतात. शिवाय स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचून आपल्या पदार्थांची उत्तम दरात विक्री करतात. ते घरीच मोहरीचं तेल काढून, हळदीची पावडर बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. शिवाय कोणत्याही रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळते.

4/5
विद्युत विभागाची नोकरी सोडल्यानंतर बलबीर यांनी स्वतः तेल काढण्याची मशीन, धान्य पिसण्याची मशीन, मसाले कुटण्याची मशीन तयार केली. आज त्यांच्याकडील मोहरीच्या तेलाला 300 रुपये किलोचा भाव मिळतो. तर, गहू 7000 रुपये किलो दराने विकले जातात. तसंच हळदीलाही हजारो रुपयांचा भाव आहे. या उत्पादनांसाठी ग्राहक आगाऊ बुकींगदेखील करतात.

5/5
बलबीर म्हणतात, अशाप्रकारच्या शेतीत मेहनत प्रचंड असते, मात्र नफादेखील तितकाच मिळतो. दरम्यान, बलबीर यांना आज वर्षभरात जवळपास 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement