भारताच्या स्वातंत्र्यदिनी तरुणांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी; आताच करा अप्लाय!
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. इथं पाहा नोकरीची संधी...
बीड, 15 ऑगस्ट: अनेक तरुणांची इच्छा असते की उच्च शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरीमध्ये कार्यरत व्हायचे. मात्र सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखे झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून सरकारी नोकर भरती प्रक्रिया क्वचित प्रमाणात निघत होती. त्यामुळे काही जागांसाठी लाखो अर्ज येत असल्याचे चित्र आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी जिल्हा परिषदेची मेगा भरती अखेर जाहीर झाली आहे. बीड जिल्हा परिषदेत 568 पदांची भरती होणार आहे.
कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
जिल्हा परिषद मेगा भरती 5 ऑगस्ट पासून खाजगी कंपनीमार्फत सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात विविध 19 संवर्गातील 568 पदांसाठी सरळसेवेने भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक हा 25 ऑगस्ट आहे.
advertisement
कोणत्या पदासाठी होत आहे भरती?
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक फवारणी क्षेत्र, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा), कनिष्ठ आरेख, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, परिवेक्षिक, पशुधन, पर्यवेक्षक, लघुलेखक, विस्तार अधिकारी (कृषी पंचायत सांख्यिकी) स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक, असे एकूण 568 पदांसाठी भरती होत आहे.
advertisement
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
http://ibpsonline.ibps.in/zpvpjune23 या संकेतस्थळावर जाण्यासाठी https://zpbeed.gov.in ' APPLY ONLINE ' या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन स्क्रीन उघडेल. अर्ज नोंदणीसाठी न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करावे. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड तयार होईल.
परीक्षा शुल्क किती ?
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1 हजार, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क राहील. माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. तसेच ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल. परीक्षा शुल्क भरलेल्या ऑनलाईन पावतीची प्रत घेणे गरजेचे आहे. ही प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रति सोबत कागदपत्राच्या तपासणी वेळी सादर करणे आवश्यक आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
August 15, 2023 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
भारताच्या स्वातंत्र्यदिनी तरुणांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी; आताच करा अप्लाय!