Ram Mandir : राम मंदिराच्या छतामधून टपटप पडतंय पाणी, नेमकं काय आहे सत्य?

Last Updated:

Ram Mandir : राम मंदिर तयार करणाऱ्या समितीला समोर येऊन नेमकं सत्य काय आहे ते सांगण्याची वेळ आली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सत्य काय आहे ते भाविकांना सांगितलं आहे.

राम मंदिराचं छत गळतंय?
राम मंदिराचं छत गळतंय?
अयोध्या : राम मंदिराच्या गर्भगृहातील छतातून पाणी गळण्याची समस्या असल्याचा दावा केला जात आहे. अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत असताना राम मंदिर तयार करणाऱ्या समितीला समोर येऊन नेमकं सत्य काय आहे ते सांगण्याची वेळ आली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सत्य काय आहे ते भाविकांना सांगितलं आहे.
राम मंदिराचं मी स्वत: परीक्षण केलं आहे. कुठेही गळतीची समस्या नाही, पहिल्या पावसात मंदिरात पाणी कसं आलं आणि खरंच गर्भगृहात पाणी गळतं का याबाबत ते जरा स्पष्टच बोलले. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात पाण्याची गळती होत नाही. कोणतीही अडचण नाही, मी स्वतः पाहणी केली. बांधकाम सुरू असलेल्या मंडपाचे छत दुसऱ्या मजल्यावर पूर्ण करण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर तोफा मंडपाचे छत झाल्यानंतरच पावसाचे पाणी मंदिरात जाणार नाही.
advertisement
ते म्हणाले की, भाविकांच्या सोयीसाठी मंडपाच्या छतावर तात्पुरते बांधकाम करून पाणी आणि सूर्यप्रकाशापासून बचावासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा सगळा भ्रम जनतेनेच निर्माण केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनीच्या आतून काही वायर टाकण्याचं काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी पाईप उघडे असून त्याच पाईपद्वारे पाणी खाली येत आहे. बांधकामात कोणत्याही पद्धतीची कमतरता नाही. राम मंदिराच्या उभारणीचे काम सर्वोत्कृष्ट पातळीवरचं आहे यात तिळमात्र शंका नाही.
advertisement
नगर शैलीचा विचार करता मंदिर संपूर्ण बंद केलं जात नाही. मंदिराचा काही भाग हा उघडाच राहतो. त्यामुळे पावसाची जोरात झडप आली तर एखादवेळी थोडं पाणी आत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भगृहात फक्त रामलल्लाला स्नान घातल्यानंतर जे जल राहातं ते एकत्र करुन ठेवण्यात आलं आहे. ते भाविकांच्या मागणीनुसार त्यांना दिलं जातं.
advertisement
पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्व मंडपांमध्ये ड्रेनेज नाले करण्यात आले आहेत. नृपेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, पाणी आपोआप बाहेर पडेल अशा पद्धतीने मंदिराचा मजला बनवण्यात आला आहे. ते म्हणतात की नगर शैलीत मंदिर चारही बाजूंनी बंद नाही. मंदिरातील मंडपाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचे भाग उघडे आहेत. मुसळधार पावसामुळे मंडपातून पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र कुठेही बांधकाम केलेल्या ठिकाणहून मंदिरात गळती होत नाही हे निश्चित असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/देश/
Ram Mandir : राम मंदिराच्या छतामधून टपटप पडतंय पाणी, नेमकं काय आहे सत्य?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement