'आम आदमीचा शीष महाल', भाजपने शेअर केला केजरीवलांच्या रॉयल बंगल्याचा Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या बंगल्यात केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना राहत होते. आम आदमीचा शीष महाल, असं कॅप्शन भाजपने या व्हिडिओला दिलं आहे.
नवी दिल्ली : भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या बंगल्यात केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना राहत होते. आम आदमीचा शीष महाल, असं कॅप्शन भाजपने या व्हिडिओला दिलं आहे. तसंच दिल्ली का मिलनेयर, असं रॅप सॉन्गही भाजपने रिलीज केलं आहे. या व्हिडिओमधून भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी एक्सवर अरविंद केजरीवलांच्या या बंगल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केजरीवलांच्या बंगल्यात सुविधांसह सुसज्ज जिम, एक स्पा कम बाथरूम दाखवण्यात आलं आहे. तसंच वॉशरूम परिसरात झुंबर, मसाज टेबल, जाकुझी आणि सेन्सर असलेला शॉवरही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
केजरीवाल यांचं दिल्लीच्या सिव्हिल लाईन्समधील घर नियम डावलून बांधण्यात आल्याचा आरोप याआधी भाजपने केला होता. आता दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना केजरीवलांच्या बंगल्यावर भाजपने निशाणा साधला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
advertisement
दिल्ली के जनता की खून-पसीने की कमाई लूट कर 'खास' आम आदमी ने खड़ा किया ये शीश महल!
देखिए, गाड़ी, बंगला, सुरक्षा नहीं लूंगा कहने वाले केजरीवाल के शीश महल की शान-ओ-शौकत... pic.twitter.com/G9Ss7ZLlR9
— BJP (@BJP4India) December 10, 2024
advertisement
'दिल्लीतल्या जनतेने रक्ताचं पाणी करून कमावलेला पैसा, खास आम आदमीने लुटला आणि शीष महाल बनवला. गाडी, बंगला, सुरक्षा घेणार नाही म्हणणाऱ्या केजरीवालांच्या शीष महालाची शान-ओ-शौकत', अशी पोस्ट वीरेंद्र सचदेवा यांनी केली आहे. याशिवाय भाजपने 'केजू है दिल्ली का मिलनेयर' हे एक रॅप सॉन्गही शेअर केलं आहे.
'हा व्हिडिओ पाहा, हे कोणतंही सामान्य घर नाही, हे भ्रष्टाचाराचे संग्रहालय आहे. स्वत:ला जनतेचा माणूस म्हणवून घेणाऱ्या केजरीवाल यांनी सौना आणि जाकुझीचा आनंद घेण्यासाठी लोकांना लुटलं आहे', असा आरोपही वीरेंद्र सचदेवा यांनी केला आहे.
advertisement
Liquor deals,
दिल्ली का नाश...
I get liquor money,
super fast
झूठा है nature,
करता नहीं care…
केजू है दिल्ली का MILLIONAIRE!#भ्रष्टाचारी_AAP pic.twitter.com/l1O6dIUs9q
— BJP (@BJP4India) December 10, 2024
'आम्ही केजरीवलांची आम आदमीची खोटी प्रतिमा मोडीत काढण्यासाठी घराचे आणखी व्हिडिओ शेअर करू. संपूर्ण प्रचारात हा व्हिडिओ दाखवला जाईल आणि गाणं वाजवलं जाईल. त्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे', असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे. दरम्यान या आरोपांबाबत आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. 2020 च्या निवडणुकीत दिल्लीत भाजपने 70 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या, तर आपला 62 जागा मिळाल्या होत्या.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
December 10, 2024 8:19 PM IST